प्रतिनिधी
अहमदाबाद : एकीकडे महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये चालल्याची हाकाटी विरोधक करत असताना प्रत्यक्षात या दोन राज्यांमधल्या सौहार्दपूर्ण सहकार्याची एक महत्त्वाची बातमी आली आहे ती देखील अत्यंत महत्त्वाच्या अशा वनक्षेत्रातून!!The lions of Gujarat will come to Maharashtra, while the tigers of Maharashtra will go to Gujarat!!
गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियायी सिंह) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यत बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात आज सोमवार, 26 सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे चर्चा झाली.
या सिंह आणि वाघ यांच्या आदलाबदली बाबतच्या प्रस्तावावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये आणि जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात आधी चर्चा झाली होती. 4 एप्रिल 2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी. मल्लिकर्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा करून कार्यवाही सुरू केली होती.
त्यावर सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री श्री विश्वकर्मा यांनी सोमवारी 26 सप्टेंबर रोजी विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले. यानंतर प्रत्यक्ष सिंह आणि वाघ यांचे अनुक्रमे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये स्थलांतर केले जाणार आहे.
महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये चालल्याच्या विरोधक करीत असलेल्या हाकाटीच्या पार्श्वभूमीवर या दोन राज्यांमध्ये हे सहकार्य विशेष मोलाचे ठरणार आहे.
The lions of Gujarat will come to Maharashtra, while the tigers of Maharashtra will go to Gujarat!!
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात लवकरच 20000 पोलीस पदांची भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
- निर्मलाताईंच्या ‘मिशन बारामती’ दौऱ्यावर सुप्रियाताईंचा वेगवान दौऱ्याचा उतारा
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय PFI च्या निशाण्यावर; महाराष्ट्र एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा
- अमेरिका – पाकिस्तान संबंध दोन्ही देशांसाठी ठरले नाकाम; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे परखड मत