• Download App
    पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशात राबविली जाणार सर्वात मोठी लसीकरण मोहीम|The largest vaccination drive in the country to mark the Prime Minister's birthday

    पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशात राबविली जाणार सर्वात मोठी लसीकरण मोहीम

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :देशातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाची भेट देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. एका दिवसातील सर्वात मोठे लसीकरण शुक्रवारी करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे.The largest vaccination drive in the country to mark the Prime Minister’s birthday

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी ७१ वा वाढदिवस आहे. ७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधांनच्या प्रशासकीय पदावरील कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्तचे कार्यक्रम ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने राबविण्याचे आवाहन केले आहे.



    आजपर्यंत लस घेतलेल्या नसलेल्यांना लसीकरण करून आणि जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून पंतप्रधानांना भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सर्वांसाठी मोफत लसीची भेट दिली आहे. आपल्या लाडक्या पंतप्रधानांचा उद्या वाढदिवस आहे.

    आपल्या प्रियजनांसह, कुटुंबातील सदस्यांसह सर्वांनी लसीकरण न केलेल्या लोकांना लस देऊया. समाजातील सर्व घटकांना लसीकरण करू. पंतप्रधानांसाठी ही वाढदिवसाची भेट असेल, असे मांडविय यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी गुरुवारी हिंदीमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    भारतीय जनता पक्षाने आपल्या देशातील सर्व शाखांना पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. आत्तापर्यंत देशातील ७७ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये शुक्रवारी मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोठी वाढ करण्याची तयारी भाजपाने केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सेवा समर्पण सप्ताह साजरा केला जातो. मात्र, यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम २० दिवस चालणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक भर लसीकरणावर दिला जाणार आहे.

    The largest vaccination drive in the country to mark the Prime Minister’s birthday

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही