विशेष प्रतिनिधी
बोस्टन : शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीयच, पण भाजपशासित राज्येच नव्हे तर देशात कोठेही अशा घटना घडल्या तर बोला, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना लगावला आहे.The killing of farmers is reprehensible, but if such incidents take place not only in the BJP-ruled state but anywhere in the country
निर्मला सीतारमन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्या आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेसंबंधी विचारण्यात आले.यावेळी बोलताना सीतारामन म्हणाल्या,
शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र अशा प्रकारचे अनेक मुद्दे देशातील इतर भागातही असून वेळीच उपस्थित करत त्यांच्यावरही समान पद्धतीने भाष्य केलं पाहिजे.घटना घडतील तेव्हा त्या उपस्थित केल्या पाहिजेत. फक्त तिथे भाजपाचं सरकार आहे म्हणून जेव्हा योग्य वाटेलच तेव्हा नाही तर घटना घडतील तेव्हा सांगा.
सीतारामन म्हणाल्या, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुनच न्याय दिला जाईल. भारतातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. माझी डॉक्टर अमर्त्य सेन यांच्यासह सर्वांना विनंती आहे की, जेव्हा कधी अशा घटना घडतील तेव्हा त्यांच्यावर भाष्य करुन मुद्दा मांडा.
फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये घडलं असेल तेव्हाच योग्य संधी म्हणून तो मांडला जाऊ नये. माझ्या कॅबिनेट सहकाऱ्याचा मुलगा कदाचित अडचणीत आहे आणि असे गृहीत धरू की प्रत्यक्षात त्यांनीच हे केले आहे आणि इतर कोणी नाही. पण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुनच न्याय दिला जाईल.
लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष मिश्राची12 तास चौकशी करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.
The killing of farmers is reprehensible, but if such incidents take place not only in the BJP-ruled state but anywhere in the country
महत्त्वाच्या बातम्या
- पतीला सोडल्यानंतर तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे प्रियकरासोबत रोमँटिक फोटोशूट
- आर्यन खानच्या अटकेला मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून धार्मिक रंग, धार्मिक तेढ पसारविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
- स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे निमलष्करी दलात नोकरीची संधी आहे. पोलीस उपनिरीक्षकपासून अनेक पदे भरली जाणार आहेत.
- अल्पवयीन मुलीवर 28 जणांचा बलात्कार, समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा