• Download App
    'द काश्मीर फाइल्स' : काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराला वाचा फोडली; अमेरिकेतील राज्याकडून अग्निहोत्रीचे कौतुक । 'The Kashmir Files': Massacre of Kashmiri Pandits exposed; Agnihotri film appreciated by the US state

    ‘द काश्मीर फाइल्स’ : काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराला वाचा फोडली; अमेरिकेतील राज्याकडून अग्निहोत्रीचे कौतुक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फारच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना वेचून ठार केले आणि नरसंहार घडवून आणल्याचा घटनेला वाचा फोडली आहे. याचे कौतुक अमेरिकेतील ऱ्होड आयलंडने केले आहे. तसे प्रशस्तिपत्रच अग्निहोत्री यांना दिले आहे. ‘The Kashmir Files’: Massacre of Kashmiri Pandits exposed; Agnihotri film appreciated by the US state



    विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 11 मार्चला चित्रपट चित्रपटगृहात झळकला आहे. तेव्हापासून त्याची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात काश्मिरी पंडितांची दुर्दशा दाखवण्यात आली आहे. ऱ्होड आयलंड, युनायटेड स्टेट्समधील लोकशाही आणि उदारमतवादी राज्याने काश्मिरी पंडितांची हत्या झाल्याचे मान्य केले. ही घटना ऐतिहासिक असल्याचे विवेक अग्निहोत्री यांनी म्हंटले आहे.

    याबाबतची माहिती विवेक अग्निहोत्रीने आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करून दिली आहे. विवेकने लिहिले की, ३२ वर्षांत पहिल्यांदाच जगातील कोणत्याही राज्याने, तेही लोकशाही आणि उदारमतवादी राज्य युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका – र्‍होड आयलंडने काश्मीरमध्ये नरसंहार झाल्याचे एका लघुपटाच्या निमित्ताने स्पष्ट झाल्याचे म्हंटले आहे.

    ‘The Kashmir Files’: Massacre of Kashmiri Pandits exposed; Agnihotri film appreciated by the US state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!