विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : केवळ आपल्यासोबत चालल्याने चिडून जाऊन कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवाकुमार यांनी शनिवारी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती त्यांच्या पाठीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा राग आल्याने डी के शिवाकुमार यांनी त्याच्या कानशिलात लगावली.The Karnataka Congress president put a slapped to one just because he walked with him
व्हिडिओत डी के शिवाकुमार कार्यकर्त्यांच्या गराड्यात पुढे जात होते. तितक्यात एक जण त्यांच्या पाठीमागे वेगाने चालत होता. त्याचबरोबर त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या या कृतीमुळे शिवाकुमार यांना चीड आली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कानशिलात लगावली.
या कृत्यानंतर त्यांनी उपस्थित असलेल्या कॅमेरामनला फुटेज डिलीट करण्यास सांगितले. यासाठी कार्यकर्ते जबाबदार असल्याचेही सांगितले. माजी मंत्री आणि खासदार जी मडेगौडा यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते गेले होते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवकुमार यांना हिंसाचाराचा परवाना दिला आहे का्? असा प्रश्न भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवि यांनी उपस्थित केला आहे. शिवकुमार यांची तुलना अंडरवर्ल्ड डॉन कोतवाल रामचंद्रा याच्याशी केली.
कोतवाल रामचंद्राची बंगळुरूत १९७० ते १९८० दशकात दहशत होती. कार्यकर्त्यांसमोरच कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्याच्या कानशिलात लगावली. मग कॅमेऱ्यापाठीमागे त्यांचं रुप कसं असेल? हे सांगायला नको, अशी टोलाही त्यांनी लगावला.
The Karnataka Congress president put a slapped to one just because he walked with him
महत्त्वाच्या बातम्या
- सोबत राहून पाठीत सुरा खुपसण्याचे काम, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अजित पवारांवर टीका
- ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकांतही भाजपचाच झेंडा, योगी सरकारच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी केले कौतुक
- जॉर्जियाला भारताकडून भावपूर्ण भेट, सतराव्या शतकातील राणी सेंट क्वीन केटवनचे पवित्र अवशेष सरकारला सोपविले
- नितीन गडकरी यांना हे शहर बनवायचे आहे भारताचे स्वित्झर्लंड, स्केइंगसाठी जगभरातून येतील पर्यटक