• Download App
    भारतीय जवानांची माणुसकी, सीमा पार करून चुकून भारतात आलेल्या आठ वर्षांच्या करीमला केले पाकिस्तानी रेंजर्सच्या सुपूर्द|The humanity of Indian soldiers, Eight-year-old Karim, who came to India by mistake, was handed over to Pakistan Rangers

    भारतीय जवानांची माणुसकी, सीमा पार करून चुकून भारतात आलेल्या आठ वर्षांच्या करीमला केले पाकिस्तानी रेंजर्सच्या सुपूर्द

    बजरंगी भाईजान चित्रपटात भारतात चुकून आलेल्या मुन्नीला पुन्हा कुटुंबियांकडे पाहोचविण्यासाठी बजरंगी भाईजानला प्राणांची बाजी लावावी लागली. परंतु, भारतीय जवानांच्या माणुसकीमुळे सीमा पार करून आलेल्या करीम याबालकाला पाकिस्तानी रेंजर्सकडे सुखरुप सुपूर्द केले.The humanity of Indian soldiers, Eight-year-old Karim, who came to India by mistake, was handed over to Pakistan Rangers


    विशेष प्रतिनिधी 

    अहमदाबाद : बजरंगी भाईजान चित्रपटात भारतात चुकून आलेल्या मुन्नीला पुन्हा कुटुंबियांकडे पाहोचविण्यासाठी बजरंगी भाईजानला प्राणांची बाजी लावावी लागली. परंतु, भारतीय जवानांच्या माणुसकीमुळे सीमा पार करून आलेल्या करीम याबालकाला पाकिस्तानी रेंजर्सकडे सुखरुप सुपूर्द केले.

    राजस्थानच्या बाडमेर सेक्टरमध्ये सोमरार सीमा तपास चौकीजवळ हा बालक भारतीय हद्दीत आला होता. सद्भावनेच्या दृष्टिकोनातून भारताने त्याला पाकिस्तानी रेंजर्ससमवेत झालेल्या फ्लॅग मीटिंगमध्ये सुपूर्द केले.



    २ एप्रिल रोजी करीम हा चुकून आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारतीय हद्दीत आला होता. तो सीमा चौकीजवळ पहाटे पोहोचला होता. भारतीय जवानांनी त्याला पाहिले व परत जाण्यास सांगितले. परंतु वदीर्तील जवानांना पाहून त्याने रडण्यास प्रारंभ केला.

    त्यानंतर जवानांनी त्याला खाण्या-पिण्यास दिले. यावर त्याने सांगितले की, तो रस्ता चुकला आहे. त्याचे गाव पाकिस्तानमधील सोमरार असून, त्यापासून तीन किलोमीटरवर तो आढळला होता.बीएसएफ मुख्यालयामधून निर्देश मिळाल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्ससमवेत तत्काळ फ्लॅग मीटिंग घेण्यात आली आणि बालकाला पाकिस्तानच्या सुपूर्द करण्यात आले.

    The humanity of Indian soldiers, Eight-year-old Karim, who came to India by mistake, was handed over to Pakistan Rangers

    Related posts

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’

    Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री