• Download App
    दहशतवादाच्या घटनांवर भारताने अंगिकारलेले मानवी मूल्यच चिरंतन|The human values ​​that India has embraced in the face of terrorism are eternal

    दहशतवादाच्या घटनांवर भारताने अंगिकारलेले मानवी मूल्यच चिरंतन

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : जगात ९/११ सारख्या दहशतवादाच्या घटनांवर भारताने अंगीकारलेली मानवी मूल्ये हेच चिरंतन असे उत्तर आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.सरदारभवन कॉम्प्लेक्स या अहमदाबाद येथील संस्थेच्या उद्घाटनानंतर दृकश्राव्य माध्यमातून बोलताना त्यांनी सांगितले की, ११ सप्टेंबर याच दिवशी अमेरिकेत मानवतेवर हल्ला झाला होता.The human values ​​that India has embraced in the face of terrorism are eternal

    जगाला त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ११ सप्टेंबर १८९३ रोजी जेव्हा जागतिक धर्मपरिषद झाली होती त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी जागतिक मंचावर येऊन जगाला भारताच्या मानवी मूल्यांची ओळख करून दिली होती. भारताची मानवतावादाची तत्त्वेच आज जगाला मार्गदर्शक ठरत आहेत.



    तमिळ कवी सुब्रमणिया भारती यांच्या तमिळ अभ्यासाला वाहिलेल्या अध्यासनाची स्थापना करण्याची घोषणा मोदी यांनी केली. हे अध्यासन बनारस हिंदू विद्यापीठाच्या कला शाखेत स्थापन केले जाणार आहे. ते म्हणाले की,

    सुब्रमणिया भारती हे स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञ व महान विद्वान होते. सरदार पटेल यांनी एक भारत-श्रेष्ठ भारतचा नारा दिला. महाकवी भारती यांच्या तत्त्वज्ञानातून आपल्याला या दिव्यत्वाची अनुभूती येते.

    The human values ​​that India has embraced in the face of terrorism are eternal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली