• Download App
    हिंदू तरुणी लग्न झाल्यावर मुस्लिम बनली आणि थेट कट्टर बनून थेट इसीसमध्ये गेली, एनआयएने केली अटक |The Hindu girl became a Muslim after getting married and went straight to ISIS after becoming a fanatic, arrested by NIA

    हिंदू तरुणी लग्न झाल्यावर मुस्लिम बनली आणि थेट कट्टर बनून थेट इसीसमध्ये गेली, एनआयएने केली अटक

    विशेष प्रतिनिधी

    मंगळुरु : लव्ह जिहादपेक्षाही भयानक प्रकार कर्नाटकात उघडकीस आला आहे. मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडून धर्मांतर करून मुस्लिम झालेली हिंदू तरुणी कट्टर धर्मांध बनून थेट इसीसच्या संपर्कात आली. इसीसमध्ये युवकांची भरती करण्यातही ती कार्यरत होती. माजी आमदार असलेल्या सासऱ्याच्या घरावर छापा टाकून राष्ट्रीय तपास यंत्रणेने तिला अटक केली आहे.The Hindu girl became a Muslim after getting married and went straight to ISIS after becoming a fanatic, arrested by NIA

    दीप्ती मार्ला उर्फ मरियम असे या तरुणीचे नाव आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) माजी आमदार दिवंगत बी. एम. इदिनाब्बा यांचे पुत्र बी. एम. बाशा यांच्या घरावर धाड टाकून आयएसआयएसशी संबंध असल्याच्या संशयावरून मरियमला अटक केली आहे.



    एनआयएचे सहायक तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक कृष्ण कुमार (दिल्ली) यांच्यासमवेत पोलीस निरीक्षक अजय सिंह आणि मोनिका धिक्वाल यांनी मरियमला अटक केली. बाशा यांचे पुत्र अनस अब्दुल रहमान यांची मरियम पत्नी आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०२१ मध्येही बाशा यांच्या घरावर धाड टाकली होती.

    दोन दिवस चौकशी केल्यानंतर अमर अब्दुल रहमान (बाशा यांचे दुसरे पुत्र) यांना अटक केली होती. मागच्या वर्षी टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान एनआयएला मरियम यांचा आयएसआयएसशी संबंधित असल्याचा संशय होता. मागच्या वर्षी टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान एनआयएने दोन दिवस मरियमची चौकशी केली होती; परंतु, अटक केली नव्हती तेव्हापासून एनआयएने तिच्या हालचालींवर नजर ठेवून होती.

    दीप्ती माला कोडागू जिल्ह्यातील आहे. डेरालाकट्टे येथील एका कॉलेजममध्ये बी.डी.एस.चे शिक्षण घेत असताना ती अनसच्या प्रेमात पडली नंतर तिने धर्मांतर केले आणि नाव बदलून मरियम ठेवले. आयएसआयएस आणि जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांशी तिचा संबंध असल्याचा संशय आहे.

    आयएसआयएसमध्ये युवकांची भरती करण्यातही सहभाग असल्याच्या संशयावरून एनआयएच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली आहे.माजी आमदार दिवंगत बी. एम. इदिनाब्बा हे कन्नडमधील प्रख्यता कवी आणि लेखक आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून आले होते. त्यांचे पुत्र बी. एम. बाशा हे देखील माजी आमदार आहेत.

    The Hindu girl became a Muslim after getting married and went straight to ISIS after becoming a fanatic, arrested by NIA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य