विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने जम्मू-काश्मीर मधले महत्त्वाचे प्रकल्प बागलीहार + सलाल आणि किशनगंगा या सगळ्या धरणांची गेट बंद केली असून त्याचा परिणाम अवघ्या 16 तासांमध्ये पाकिस्तान दिसला. पाकिस्तानात वाहून जात असलेल्या चिनाब आणि झेलम नद्यांचा जलस्तर 40 % कमी झाला. ऐन उन्हाळ्यात आज जलस्तर कमी झाल्याने पाकिस्तानात पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.The gates of all the dams of Baglihar
रामबन जिल्ह्यातील बागलीहार आणि रेसाई जिल्ह्यातील सलाल धरणांची गेट बंद केल्यामुळे चिनाब नदीचा जलस्तर घटला. त्याचबरोबर किशनगंगा धरणाची गेट बंद केल्याने झेलम नदीचा जलस्तर घटला. परंतु तीनही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे भारतासाठी उपयुक्त असलेल्या विजेची निर्मिती सुरळीत सुरू राहणार आहे.
चिनाब आणि झेलम या दोन्ही नद्या पाकिस्तानातल्या पंजाब आणि सिंध प्रांतातून वाहत असल्याने तिथली शेती आणि पिण्याचे पाणी या दोन्ही बाबतीत पाकिस्तान या दोन्ही नद्यांच्या जलसाठ्यांवर अवलंबून आहे. या जलसाठ्यांचा स्तर आत्ताच 40 % घटला आहे. तिन्ही धरणांची गेट अजून काही काळ बंद राहिली, तर पाकिस्तानातला दोन्ही नद्यांचा जलस्तर झपाट्याने खाली येईल आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत तो 0 स्तरावर येऊन पोहोचेल. त्यामुळे पाकिस्तानात आत्तापासूनच हाहाकार व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याने आम्ही भारताच्या कुठल्याही प्रकल्पावर हल्ला करू, अशी धमकी दिली आहे. भारताने आता या तिन्ही धरणांच्या भोवतालची सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.
The gates of all the dams of Baglihar + Salal + Kishanganga are closed; Chenab + Jhelum rivers in Pakistan have dried up!!
महत्वाच्या बातम्या
- प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’
- Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा
- Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!
- Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग