• Download App
    ‘’आगामी काळ भारताचा आणि सनातन धर्माचा आहे’’ सरसंघचालक मोहन भागवतांचं वाराणसीत विधान! The future belongs to India and Sanatan Dharma Varanasi statement of Sarsangchalak Mohan Bhagwat

    ‘’आगामी काळ भारताचा आणि सनातन धर्माचा आहे’’ सरसंघचालक मोहन भागवतांचं वाराणसीत विधान!

    ‘’सनातन धर्म आणि भारताच्या उन्नतीची हीच वेळ आहे’’ असंही म्हणाले

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : ‘’आगामी काळ भारताचा आणि सनातन धर्माचा आहे’’, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे विशेषतः उत्तर भारतात वैदिक ज्ञानाचे खूप नुकसान झाले आहे. वेदांमध्ये ज्ञानाचे भांडार आहे. सरसंघचालक रविवारी (६ ऑगस्ट) काशी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. The future belongs to India and Sanatan Dharma Varanasi statement of Sarsangchalak Mohan Bhagwat

    मोहन भागवत रविवारी वाराणसीला पोहोचले. त्यांनी कांची कामकोटी येथील शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली जे गंगेच्या काठावर वसलेल्या चेत सिंह किल्ला संकुलात चातुर्मास करत होते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान दोघांमध्ये संवादही झाला. यासोबतच शंकराचार्यांच्या चातुर्मास व्रतस्थळी आयोजित अग्निहोत्र सभेच्या यज्ञ कार्यक्रमात भागवत सहभागी झाले होते.

    टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, वेद हे आपल्या ज्ञानाचे भांडार आहेत. यामध्ये सर्व काही समाविष्ट आहे. विशेषत: उत्तर भारतात सततच्या आक्रमणांमुळे वैदिक ज्ञानाला नुकसान सहन करावे लागले. अग्निहोत्राचे अनुयायी युगानुयुगे या ज्ञानाचे रक्षण करत आले आहेत. ही परंपरा वाढवण्याची गरज असल्याचेही सरसंघचालक म्हणाले.

    अग्निहोत्र परंपरेच्या अनुयायांच्या कार्याचे कौतुक करताना सरसंघचालक म्हणाले, तुम्ही तुमचे कार्य करत रहा. हिंदू समाज तुमच्या रक्षणासाठी आहे. सनातन धर्म आणि भारताच्या उन्नतीची हीच वेळ आहे. भारताने संपूर्ण जगाला धर्माचे ज्ञान द्यायचे आहे. धर्माच्या मुळाशी सत्य आहे. तसेच, ते म्हणाले, आज संपूर्ण जग वेदांचा विचार करत आहे. आमच्याकडे माहिती आहे, पण पूर्ण माहिती नाही. आजही तुम्ही लोक आमच्या अध्यात्माचे रक्षण करण्याचे काम करत आहात. तुमचे दर्शन घेऊन मी धन्य झालो.

    The future belongs to India and Sanatan Dharma Varanasi statement of Sarsangchalak Mohan Bhagwat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!