रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्याचे कार्य सुरू
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS)मध्ये आज (सोमवार) अचानक आग लागली. दिल्लीतील एम्समध्ये आगीची ही घटना सकाळी 11.55 वाजता घडली. आगीची माहिती मिळताच दिल्ली एम्सच्या अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. Delhi AIIMS Fire Massive fire in Delhi AIIMS eight fire engines reached the spot
दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (दिल्ली एम्स) मध्ये आग लागताच एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या एंडोस्कोपी विभागात ही आग लागली. आग लागण्याचे वृत्त पसरताच रुग्ण व त्यांच्या सेवकांची धावपळ सुरू झाली.
रुग्णालय प्रशासनाने तत्परता दाखवत सर्व रुग्णांना तातडीने आग लालगेल्या वॉर्डमधून सुरक्षितपणे बाहेर काढले. सुदैवाने आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यात गुंतले आहेत.
Delhi AIIMS Fire Massive fire in Delhi AIIMS eight fire engines reached the spot
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंकेचा महत्त्वाचा निर्णय, चिनी-पाकिस्तानी कंपन्यांकडून काढला LNG प्रकला, भारताला देणार
- आसाममध्ये बहुविवाहावर बंदी येणार, तज्ज्ञ समितीने सादर केला अहवाल ; मुख्यमंत्री हिमंता म्हणाले…
- ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जातीयवादी’, सुवेंदू अधिकारी यांचा मोठा आरोप, म्हणाले- बंगालमधून नूंहमध्ये पाठवले लोक
- ‘’अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना…’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!