• Download App
    दहशतवादी ओसामाला ठार करणाऱ्या माजी अमेरिकन कमांडरला अटक, जाणून घ्या काय कारण The former American commander who killed the terrorist Osama was arrested know the reason

    दहशतवादी ओसामाला ठार करणाऱ्या माजी अमेरिकन कमांडरला अटक, जाणून घ्या काय कारण

    माजी कमांडर याआधीही वादात सापडले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    टेक्सास : पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणार्‍या अमेरिकन नेव्ही सीलचा माजी कमांडर रॉबर्ट जे ओ’नील यांना अमेरिकन पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. माजी कमांडरला टेक्सास सिटीमध्ये मद्यपान करून गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, नीलला अटक झाल्यानंतर काही तासांतच जामीन मिळाला. The former American commander who killed the terrorist Osama was arrested know the reason

    न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, 47 वर्षीय रॉबर्ट जे. ओ’नीलवर फ्रिस्कोमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बुधवारी अटक करण्यात आली. मात्र, नीलला अटक केल्यानंतर काही तासांतच 2 लाख 88 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले. वृत्तानुसार, त्याला लाउंजमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. माजी कमांडर पॉडकास्ट रेकॉर्ड करत असताना हा गोंधळ झाला.

    न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, माजी कमांडर याआधीही वादात सापडले आहेत. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये, अमेरिका महामारीच्या विळख्यात असतानाही त्याने मास्क घालण्यास नकार दिला होता. यापूर्वी, नीलने 2013 मध्ये एस्क्वायर मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याने मे 2011 मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ऑपरेशन नेपच्यून स्पीयर दरम्यान बिन लादेनचा खात्मा केला होता.

    The former American commander who killed the terrorist Osama was arrested know the reason

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार