• Download App
    Abijeet Dipke च्या भाषणात कन्हैया कुमारचा आवेश; मोदी सरकारला शिव्या घालायचे मुद्दे तेच!!

    Abijeet Dipke च्या भाषणात कन्हैया कुमारचा आवेश; मोदी सरकारला शिव्या घालायचे मुद्दे तेच!!

    नाशिक : Abijeet Dipke च्या भाषणात कन्हैया कुमारचा आवेश; मोदी सरकारला शिव्या घालायचे मुद्दे तेच!!, हे चित्र आज आज दिल्ली विमानतळावर दिसले आणि त्यानंतर जंतर-मंतरवर दिसले.

    – अभिजीत दिपकेचे भावनिक भाषण

    CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक नेता अभिजीत दिपके आज अमेरिकेतून भारतात येऊन दाखल झाला त्यावेळी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला काही चौकशीसाठी थांबवून धरले. मात्र सुरुवातीला त्याला का थांबवून धरले, याविषयी संभ्रम पसरून एक वेगळी वातावरण निर्मिती झाली होती. पण साधारण दीड तासांच्या चौकशी नंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभिजीत दिपके याला सोडून दिले. मात्र दिल्ली विमानतळ सोडल्यावर जंतर-मंतरवर येऊन त्याने फारच भावनिक भाषण केले. अमेरिकेतून दिल्लीत परत येताना विमानातच माझ्या मनात आले की सरकार मला अटक करेल. आपण आता स्वातंत्र्याचे शेवटचे काही क्षण उपभोगत आहोत. दिल्लीत उतरल्यानंतर आपले स्वातंत्र्य संपेल. पण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपण आपल्या स्वातंत्र्याचा सुद्धा त्याग करू. तुम्ही युवकांच्या सोशल मीडिया पोस्ट डिलीट करू शकाल पण आमच्या आज लागलेली आग विझवू शकणार नाही. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर लीकची जबाबदारी घेतलीच पाहिजे. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी अभिजीत दिपके याने केली.

    या देशातल्या विद्यार्थी प्रामाणिक आहे तो पैशाने विकला जात नाही आणि विकत घेतलाही जाऊ शकत नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच या सरकारला झुकवून दाखवू. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा सुद्धा अभिजीत दिपकने दिला.



    – अभिजीतच्या भाषणाला जोरात प्रतिसाद

    अभिजीत दिपके यांचे हे भाषण ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर गर्दी केली होती. अनेकांच्या हातात राज्यघटनेचे लाल पुस्तक, महात्मा गांधींचे प्रतिमा आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असा सगळा ऐवज होता. सर्व विद्यार्थ्यांनी अभिजित दिपकेच्या भाषणाला तुफान प्रतिसाद दिला. अभिजीत दिपके याचे भाषण सुरू असताना विद्यार्थ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा सुद्धा दिल्या.

    – कन्हैया कुमारचे नेहरू विद्यापीठातले भाषण

    अभिजीत दिपके याच्या भाषणाचा सगळा आवेश हा कन्हैया कुमार सारखा होता. कन्हैया कुमारने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही वर्षांपूर्वी असेच भाषण केले होते त्यावेळी सुद्धा विद्यार्थ्यांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला होता. काही विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारच्या भाषणाच्या वेळीच भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी कन्हैया कुमारचे भाषण प्रचंड गाजले होते. कन्हैया कुमारने त्या भाषणामध्ये मोदी सरकारला प्रचंड शिव्या घातल्या होत्या. कन्हैया कुमारच्या प्रत्येक शब्दा गणिक विद्यार्थ्यांचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळत होता. किंबहुना कन्हैया कुमार का भाषणानंतरच संपूर्ण देशात व्हायरल झाला होता. त्यानंतर कन्हैया कुमारने कम्युनिस्ट पार्टीत प्रवेश केला होता. त्याने कम्युनिस्ट पार्टीच्या चिन्हावर बिहार मधून लोकसभेची निवडणूक सुद्धा लढविली होती. पण त्या निवडणुकीत त्याला पराभव पत्करावा लागला होता. त्या नंतर कन्हैया कुमारने कम्युनिस्ट पार्टी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सध्या तो राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये आपली राजकीय वाटचाल करतोय.

    – धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कठीण

    अभिजीत दिपके याच्या भाषणात कन्हैया कुमारचाच आवेश होता. कन्हैया कुमारने त्यावेळी मांडलेले मुद्देच अभिजीत दिपकेने वेगळ्या भाषेत मांडले. कन्हैया कुमारने जशा मोदी सरकारला शिव्या घातल्या होत्या तशाच अभिजीत दिपके यांनी सुद्धा मोदी सरकारला शिव्या घातल्या. कन्हैया कुमारची राजकीय वाटचाल कम्युनिस्ट पार्टीकडे झाली. त्यानंतर काँग्रेसकडे झाली. अभिजीत दिपकेची राजकीय वाटचाल जंतर-मंतर वरून कोणत्या दिशेने जाईल??, हे येणारा काळच सांगेल. बाकी धर्मेंद्र प्रधान ऐ राजीनामा वगैरे होणे कठीण आहे.

    The fiery spirit of Kanhaiya Kumar in Abijeet Dipke’s speech.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    GDP : GDP भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार झेप! 2026-27 मध्ये 7.7% वाढीचा अंदाज; चीन-अमेरिकेलाही टाकणार मागे

    Rahul Gandhi : ‘सरकार देशाची नैसर्गिक संपत्ती विकत आहे’; राहुल गांधींचा हल्लाबोल, ग्रेट निकोबार प्रकल्पावरून केंद्रावर गंभीर आरोप

    Gilgit-Baltistan : गिलगिट-बाल्टिस्तान निवडणुकीवरून भारताचा पाकिस्तानला कडक इशारा; ‘बेकायदा कब्जातील भागात निवडणुका मान्य नाहीत’