विमानात 185 प्रवासी होते, जाणून घ्या पुढे काय घडलं? The engine of the Air India Express plane caught fire as soon as it took off
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शनिवारी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाच्या इंजिनला टेक ऑफ केल्यानंतर लगेचच आग लागली. या विमानात 185 लोक होते. इंजिनला आग लागल्याची माहिती पायलटला मिळताच त्यांनी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. त्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच शनिवारी (18 मे) एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान बंगळुरूहून कोचीला जात होते. यादरम्यान विमानाच्या उजव्या इंजिनमधून ज्वाळा निघू लागल्या. पायलटने घाईघाईने रात्री ११.१२ वाजता बीएलआर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.
एअर इंडियाचे इराणच्या हवाई हद्दीतून जाणे बंद, जाणून घ्या काय आहे कारण?
बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने रविवारी याबाबत माहिती दिली. विमानतळाने सांगितले की, बंगळुरूहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे इंजिनला आग लागल्याने बंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. एअर इंडिया एक्स्प्रेसने एका निवेदनात म्हटले आहे की, सर्व प्रवासी आणि चालक दलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.
The engine of the Air India Express plane caught fire as soon as it took off
महत्वाच्या बातम्या
- अधीर रंजन चौधरी बंगालमध्ये लढवताहेत काँग्रेसचा उरलेला बालेकिल्ला, पण खर्गेंनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!
- कष्टाला नाही कमी, यशाची हमी : 52 दिवस : 115 सभा, माध्यमांना 67 मुलाखती; फडणवीसांचा झंझावात!!
- संघ आणि भाजप कार्यक्षेत्रे वेगळी, पण विचारप्रणाली एकच “राष्ट्र प्रथम”; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांची स्पष्टोक्ती!!
- अफगाणिस्तानात पुराचा कहर, 70 ठार, अनेकजण बेपत्ता!