• Download App
    मुस्लिम मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नाशकात शहर काझींनी 7 निकाह पुढे ढकलले!! City Qazis postpone 7 Nikahs in Nashik to increase Muslim voter turnout

    मुस्लिम मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नाशकात शहर काझींनी 7 निकाह पुढे ढकलले!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदानाचा टक्का वाढवावा, या हेतूने नाशिक शहरात उद्या 20 मे 2024 सोमवारी होणारे 7 निकाह शहर काझींनी पुढे ढकलले आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढायला हवा. त्यामुळे सोमवारी होणारे निकाह आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून ते पुढे ढकलले अशी माहिती स्वतः शहर ए काझी एजाज काझी यांनी दिली.  City Qazis postpone 7 Nikahs in Nashik to increase Muslim voter turnout



    महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का इतर राज्यांपेक्षा घसरलेला दिसला तर सर्व राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 60 % ते 65 % अशी ओलांडली असताना महाराष्ट्रातले मतदान 55 % च्या रेंजमध्ये राहिले.

    या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातला मुसलमान मतांचा टक्का वाढवण्यासाठी शहर ए काझी एजाज काझी आणि मुस्लिम धर्मगुरू शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन खतीब यांनी सोमवारी होणारे 7 निकाह आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. आता हे 7 निकाह मंगळवारी म्हणजे 21 जून रोजी होणार आहेत, तसेच सार्वजनिक कार्यक्रम आहे इतर दिवशीच होणार आहेत.

    City Qazis postpone 7 Nikahs in Nashik to increase Muslim voter turnout

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : मोदी म्हणाले- टीएमसीचा अहंकार तुटला, भाजपचा विजय निश्चित; ममता सरकारच्या राजवटीत ‘माँ-माटी, मानुष’चा सन्मान नाही

    गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची नाशिककरांना तीन दिवसांची संधी!!

    Lodhi Estate Home : भाजपने केजरीवाल यांच्या नवीन निवासस्थानाचे फोटो जारी केले; दिल्लीचे मंत्री प्रवेश वर्मा यांचा आरोप- त्यांच्या मनात शीशमहल