• Download App
    निवडणुकीचा निकाल लागला आणि ५३ दिवसांनी ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून उतरून चालू लागल्या!|The election results came out and after 53 days Mamata Banerjee got down from her wheelchair and started walking!

    निवडणुकीचा निकाल लागला आणि ५३ दिवसांनी ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून उतरून चालू लागल्या!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविला. जणू त्याच आनंदात ममता बॅनर्जी चक्क ५३ दिवसांनी चालू लागल्या.The election results came out and after 53 days Mamata Banerjee got down from her wheelchair and started walking!


    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविला. जणू त्याच आनंदात ममता बॅनर्जी चक्क ५३ दिवसांनी चालू लागल्या.

    नंदीग्राममध्ये निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात निवडणूक होती. यावेळी ममता बॅनर्जी पाय घसरून पडल्या होत्या. तेव्हापासून निवडणुकीचा संपूर्ण प्रचार त्यांनी व्हिलचेअरवरून केला होता. आता अचानक त्यांना ठीक झालेलं पाहून भाजपने हे सर्व नाटक असल्याचा आरोप केला आहे.



    नंदीग्राममध्ये प्रचार सुरू असताना ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. भारतीय जनता पक्षाकडून हा हल्ला केल्याचा आरोप ममतांनी केला होता.

    अपघातानंतर ममता बॅनर्जी यांनी आपले नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले होते. पायावरून गाडी घालण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाने याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.

    निवडणूक आयोगानेही या घटनेचा सखोल तपशील मागितला होता. आपल्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे आपले सर्व दौरे आणि महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. यामुळे याचा निवडणूक निकालावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले होते.

    त्यानंतरच्या सर्व टप्यात ममता बॅनर्जी यांनी व्हिलचेअरवर बसून प्रचार केला होता. प्रचारात त्यांचा प्लॅस्टरमध्ये पाय असलेला दिसत होता. यावरून एका भाजपा नेत्याने त्यांनी बर्म्युडा घालण्याचा सल्ला दिल्यावर वादही निर्माण झाला होता.

    The election results came out and after 53 days Mamata Banerjee got down from her wheelchair and started walking!

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य