• Download App
    काँग्रेस कार्यकारिणीत चर्चा मनमोकळी हवी, पण ती चार भिंती मध्येच!!, बाहेर जाताना एकमतच हवे; सोनिया गांधींनी जी 23 नेत्यांना सुनावले। The discussion in the Congress executive should be free, but it should be within four walls !! Sonia Gandhi addressed the G23 leaders

    काँग्रेस कार्यकारिणीत चर्चा मनमोकळी हवी, पण ती चार भिंती मध्येच!!, बाहेर जाताना एकमतच हवे; सोनिया गांधींनी जी 23 नेत्यांना सुनावले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी परखड निवेदन सादर केले आहे. काँग्रेस कार्यकारणी मध्ये मनमोकळी चर्चा जरूर व्हावी, पण ती चार भिंतींमध्ये असावी. बाहेर जाताना आपल्यामध्ये एकमतच असायला हवे, असा स्पष्ट इशारा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या जी 23 गटाचा नेत्यांना दिला आहे. The discussion in the Congress executive should be free, but it should be within four walls !! Sonia Gandhi addressed the G23 leaders

    सोनिया गांधी यांचे लेखी निवेदन काँग्रेसने प्रसिद्ध केले आहे यामध्ये सोनिया गांधी यांनी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांपासून ते सध्याच्या शेतकरी आंदोलनात पर्यंत सर्व विषयांचा व्यापक आढावा घेतला आहे. संघटनात्मक निवडणुका झाल्या पाहिजेत हा आग्रह सोनिया गांधी यांनी मान्य केला आहे. त्याचा निश्चित रोड मॅप कसा असेल याविषयीचे तपशील पक्षाचे संघटन सचिव वेणुगोपाल जाहीर करतील, असे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणाविषयी सोनिया गांधी यांनी परखड भाष्य करत मोदी सरकारचे वाभाडे काढले आहेत. त्याच वेळी पक्षांमध्ये तरुणांनी वेगवेगळ्या पदांवर काम करायला सुरुवात केली असल्याचे आवर्जून नमूद केले आहे. यात सोनिया गांधी यांनी राहुल गांधींचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शेतकरी आंदोलनापासून ते अन्य काही विषयापर्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरले आहे. डॉ. मनमोहन सिंग आणि राहुल गांधी एकमेकांशी समन्वय राखून काम करतात, याकडे सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले आहे.

    मध्यंतरीच्या काळात राहुल गांधी यांनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी या तरुण नेत्यांना काँग्रेसमध्ये सहभागी करून घेतले, असा संदर्भ सोनिया गांधी यांनी आपल्या लेखी निवेदनात त्यांची नावे न घेता दिला आहे. त्याच वेळी संघटनेच्या सर्व स्तरांच्या निवडणुकांवर त्यांनी भाष्य करताना आपण काँग्रेस कार्यकारिणीमध्ये मनमोकळी चर्चा करू या. मी त्याचे स्वागतच करते परंतु ही चर्चा चार भिंतीमध्येच राहू द्या. बाहेर जाताना आपल्यामध्ये एकमतच असले पाहिजे. माध्यमांशी बोलताना संपूर्ण कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे असे चित्र उभे राहिले पाहिजे, असा इशारा त्यांनी जी 23 नेत्यांचे नाव न घेता दिला.

    पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांचे महत्त्व मी जाणते त्या व्हायलाच पाहिजेत, असे माझे मत आहे परंतु काँग्रेस कार्यकारिणीने मला पक्षाचे हंगामी अध्यक्ष नेमले आहे. त्यामुळे आपण एकत्रित काम करून पुढे गेले पाहिजे. स्वयंशिस्तीने आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवून आपली वर्तणूक असली पाहिजे असे देखील सोनिया गांधी यांनी लेखी निवेदनात आवर्जून नमूद केले आहे.

    The discussion in the Congress executive should be free, but it should be within four walls !! Sonia Gandhi addressed the G23 leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य