वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी मधली फूट संसदेतल्या गांधीजींच्या संस्थेतल्या पुतळ्याच्या साक्षीने समोर आली. केंद्र सरकार सध्या मागे घेत असलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या साक्षीने काँग्रेस पक्षाने निदर्शने केली आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने देखील निदर्शने केली, पण ती वेगवेगळी!! The demonstration was witnessed by a statue of Gandhiji in Parliament; But Congress and Trinamool are different !!
दोन्ही पक्षांनी आपापल्या निदर्शनांचे टाइमिंग एकापाठोपाठ एक ठेवले होते. आपण काँग्रेसच्या निदर्शनांमध्ये सामील होणार नाही याची पुरेपूर “राजकीय काळजी” तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली. आधी काँग्रेसच्या काँग्रेसचे खासदार महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी जमले. त्यांनी सरकारविरोधात आणि कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामध्ये नंतर सोनिया गांधी सामील झाल्या. फोटो अपॉर्च्युनिटी झाली. त्यानंतर काँग्रेसचे निदर्शक खासदार गांधीजींच्या पुतळ्यापासून दूर गेले.
नंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी गांधीजींच्या पुतळ्या पाशी येऊन सरकार विरोधी घोषणा दिल्या आणि निदर्शने केली. त्यांचीही फोटो अपॉर्च्युनिटी झाली. दोन्हींचे वेगवेगळे फोटो प्रसिद्धीला देण्यात आले. आता हे दोन्ही काँग्रेस पक्ष संसदेत वेगवेगळे बसून सरकारला कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरून वेगवेगळे धारेवर धरताना दिसत आहेत.
The demonstration was witnessed by a statue of Gandhiji in Parliament; But Congress and Trinamool are different !!
महत्त्वाच्या बातम्या
- SCHOOLS REOPEN : शाळेचा मुहुर्ताला पुन्हा ब्रेक?आज होणार निर्णय; कॅबिनेट बैठकीकडं महाराष्ट्राचं लक्ष
- NEW GUIDELINES : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर बंधने ; वाचा सविस्तर
- ज्येष्ठांनो उत्तम आरोग्यासाठी बसून राहण्यापेक्षा आपल्याच घरात छोटी-मोठी कामे करा
- बॅंकांना गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या कर्जबुडव्यांचा माग काढू – निर्मला सीतारामन
- Corona Variant Omicron : सतर्क राहा! ओमिक्रॉनमुळे भारताला गंभीर इशारा ; मास्क म्हणजे खिशातील लस ; WHOचे आवाहन
- रानडुकराच्या शिकारीची केरळची परवानगी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने फेटाळली