• Download App
    सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने विराट युद्धनौकेचे तोडकाम सुरूच राहणार|The demolition of virat warship will continue after the Supreme Court rejects the petition

    सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने विराट युद्धनौकेचे तोडकाम सुरूच राहणार

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेचे जतन करून त्याचे रुपांतर पुढे संग्रहालयामध्ये केले जावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.The demolition of virat warship will continue after the Supreme Court rejects the petition

    न्यायालयाच्या या आदेशांमुळे विराटचे सध्या सुरू असलेले तोडकाम तसेच सुरू राहणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत तुम्हाला सरकारकडे सादरीकरण करण्यास सांगितले होते.


    सरकारने (संरक्षण मंत्रालय) तुमची मागणी फेटाळून लावली आहे. तुम्ही याला नंतर आव्हान दिले नव्हते.’’ सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.

    या युद्धनौकेच्या संवर्धनासाठी एनव्हीटेक मरिन कन्सल्टंट प्रा. लिमिटेड या संस्थेकडून करण्यात आलेले सादरीकरण हे संरक्षण मंत्रालयानेच आधीच फेटाळून लावले असल्याची नोंद देखील सर्वोच्च न्यायालयाने यावेळी घेतली. याबाबत आज न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडली.

    The demolition of virat warship will continue after the Supreme Court rejects the petition

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!