• Download App
    रामलीला सुरू असतानाच राम वियोगाच्या प्रसंगात दशरथाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू|The death of the actor who played the role of Dasharatha on the occasion of Ram Viyoga while Ramli was on

    रामलीला सुरू असतानाच राम वियोगाच्या प्रसंगात दशरथाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    बिजनौर : रामलीला सुरू असतानाच राम वनवासाला जाण्याच्या प्रसंगात दुःखी आणि व्याकुळ झाल्याचा अभिनय करताना दशरथाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू झाला.उत्तर प्रदेशातील बीजनोर येथे हा प्रकार घडला.The death of the actor who played the role of Dasharatha on the occasion of Ram Viyoga while Ramli was on

    श्वासोच्छ्वास होत नसताना हा अभिनय नाही’ हे प्रेक्षकांच्या आणि सहकारी कलाकारांच्या लक्षात येईपर्यंत ‘दशरथा’ची भूमिका निभावणाऱ्या राजेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला होता.
    हसनपूर गावात सुरु असलेल्या ‘रामलीला’ सादरीकरणा दरम्यान ही घटना घडली.



    कलाकार राजेंद्र सिंह दशरथ राजाच्या भूमिकेत मंचावर हजर झाले होते. राम वनवासाकडे निघाल्याचं दृश्यं कलाकारांनी मंचावरून सादर केलं. राम वियोगात दशरथ राजाने आपले प्राण सोडल्याचं दृश्य सादर झालं आणि त्यानंतर मंचावरचा पडदाही पडला. परंतु, दशरथाची भूमिका निभावणारे राजेंद्र सिंह काही उठले नाही.

    हे पाहून राजेंद्र सिंह यांना उठवण्यासाठी त्यांचे साथी कलाकार धावले. परंतु, राजेंद्र सिंह यांचा श्वासोच्छवास थांबल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ‘दशरथ राजा’च्या भूमिकेत दिसणाऱ्या राजेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याक

    गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून रामलीलेच्या संचात राजेंद्र सिंह राजा दशरथाची भूमिका निभावत आपला उदरनिर्वाह करत होते. प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवण्याची त्यांच्यात होती, अशा भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

    The death of the actor who played the role of Dasharatha on the occasion of Ram Viyoga while Ramli was on

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य