विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यामध्ये कॉँग्रेस सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र, आपल्या पक्षाचे निवडून आलेले आमदार टिकविणेही कॉँग्रेसला शक्य झालेले नाही. चार वषार्पूर्वी झालेल्या गोव्याच्या निवडणुकीत 17 आमदार निवडून आलेल्या काँग्रेसचे केवळ चार आमदार राहिले आहेत.The Congress, which is dreaming of power, has not been able to sustain even the elected MLAs, only three out of 17 in four years.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या वर्षी आॅक्टोबरमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांनी काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा दिला आणि नंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस(ळटउ)मध्ये ते सहभागी झाले.
नाईक यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या 40 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ तीनवर आले आहे. गोव्यातील पोंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाºया नाईक यांनी विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकरयांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही होती, ज्यांनी गेल्या वर्षी सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केला होता.
राजीनामा सादर केल्यानंतर नाईक म्हणाले, की मी राजीनामा दिलाय. पुढे काय करायचं हे लवकरच सांगेन. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. रवी नाईक यांचा धाकटा मुलगा रॉय नाईक यांनी सांगितलं, त्यांनी वडिलांना भाजपामध्ये येण्याची विनंती केली आहे.
The Congress, which is dreaming of power, has not been able to sustain even the elected MLAs, only three out of 17 in four years.
महत्त्वाच्या बातम्या
- चंद्रावर पडणार भारतीयाचे पाय, चांद्रमोहिमेवर भारतीय भोजन नेण्याचीही योजना
- ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका रद्द करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी
- अफ्सा कायदा देशावर काळा डाग, सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करण्याची नागालॅँड सरकारची मागणी
- धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर, आय एम बाबरी लिहिलेले बॅज विद्यार्थ्यांच्या खिशाला लावले
- पवार बनणार काँग्रेस आणि ममता यांच्यातला पूल?, की दोघांनाही देणार राजकीय हूल…??