• Download App
    कॉंग्रेसची अवस्था खूपच वाईट! कपिल सिब्बल म्हणाले दोन वर्षांपासून सोनिया गांधींसह वरिष्ठ नेत्यांशी संवादच झाला नाही The condition of the Congress is very bad! Kapil Sibal said there had been no dialogue with senior leaders, including Sonia Gandhi, for two years

    कॉंग्रेसची अवस्था खूपच वाईट! कपिल सिब्बल म्हणाले दोन वर्षांपासून सोनिया गांधींसह वरिष्ठ नेत्यांशी संवादच झाला नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भाजपामध्ये लोकशाही नसल्याचा आरोप करणाºया कॉँग्रेसच्या डोळ्यात माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चांगलेच अंजन घातले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सोनिया गांधी किंवा कॉँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चाच झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाची अवस्था खूपच वाईट असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. The condition of the Congress is very bad! Kapil Sibal said there had been no dialogue with senior leaders, including Sonia Gandhi, for two years

    कपिल सिब्बल यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या मेजवानीत गांधी कुटुंबांतील कोणालाही बोलावले नव्हते. तरीही राहूल गांधी यांच्या लंच डिप्लोमसीपेक्षा जास्त पक्षांचे नेते उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर इंडिया टूडेचे राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत सिब्बल म्हणाले, पक्षाचा प्रभाव झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पक्ष अडचणीत आला आहे. कार्यकर्तेच पक्षाला मोठे करत असतात. परंतु, आम्ही त्यांनाच भेटत नाही. त्यांच्याशी संवादही साधत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याची भावना आहे. यासाठी तातडीने कार्यकर्त्यांमध्ये जायला हवे. भाजपाशी सामना केवळ कॉँगेसच करू शकते. परंतु, त्यासाठी पक्षामध्ये उच्चस्तरावर संवाद घडायला हवा. हेच होत नाही.
    कोणत्याही पक्षाला एक अध्यक्ष हवा असतो. परंतु, कॉँग्रेसला अध्यक्षच नाही. त्यामुळे पक्ष चालविण्यात अडचणी येत आहेत. लोकांचा पक्षावरील विश्वास उडत चालला आहे.



    गांधी कुटुंबाला बाजुला ठेऊन तुम्ही विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहात का? या प्रश्नांवर सिब्बल म्हणाले, गांधी कुटुंबाचा याच्याशी काहीही संबंध नाही. देशातील जनता आम्हाला प्रश्न विचारत आहे. आम्ही भाजप विरोधी आहोत पण पर्याय काय आहे? मला वाटते आता पर्याय देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची वेळ आली आहे. बहुजन समाज पार्टी वगळता प्रत्येक राजकीय पक्ष मेजवानीसाठी उपस्थित होता. त्यांच्याशी संवाद सुरू करायचा आहे. विरोधी पक्षांनी एकमेंकांशी बोलण्याची गरज आहे.

    अकाली दलाचे नरेश गुजराल म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गांधी घराण्याच्या तावडीतून मुक्त करण्याची गरज आहे यावर उत्तर देताना सिब्बल म्हणाले, ते आमचे ध्येय नाही. आम्हाला काँग्रेस मजबूत करायची आहे. भारतातील लोकांना भाजप नको आहे, त्यांना एक प्रभावी पर्याय हवा आहे आणि आम्ही त्यांना ते देऊ इच्छितो.

    The condition of the Congress is very bad! Kapil Sibal said there had been no dialogue with senior leaders, including Sonia Gandhi, for two years

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची