• Download App
  राजस्थानातले काँग्रेस सरकार जाणार हा मुख्यमंत्र्यांनाच आत्मविश्वास; पण त्यांच्या योजना बंद करणार नाही, मोदींनी दिला विश्वास!!|The Chief Minister is confident that the Congress government will go in Rajasthan; But won't stop their plans, Modi assured!!

  राजस्थानातले काँग्रेस सरकार जाणार हा मुख्यमंत्र्यांनाच आत्मविश्वास; पण त्यांच्या योजना बंद करणार नाही, मोदींनी दिला विश्वास!!

  वृत्तसंस्था

  चितोडगड : राजस्थानात काँग्रेसचे सरकार जाणार हा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाच विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप भाजपला विनंती केली आहे की आपल्या योजना त्यांनी बंद करू नयेत. मी संपूर्ण राजस्थानला आश्वासन देतो की काँग्रेस सरकारची एकही योजना भाजप सरकार बंद करणार नाही. उलट त्या अधिक कार्यक्षमपणे राज्यात राबवू, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्तोडगड मध्ये दिला.The Chief Minister is confident that the Congress government will go in Rajasthan; But won’t stop their plans, Modi assured!!  राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दुसरा राजस्थान दौरा आहे. याआधी त्यांनी जयपूर मध्ये महिलांच्या महारॅलीला संबोधित केले होते. आज चित्तोडगड मध्ये त्यांनी महासभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, की मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्वतःच प्रामाणिकपणे पुढे येऊन राजस्थान मधले सरकार जाणार असल्याची कबुली देऊन टाकली आहे. त्यांना राजस्थानात भाजप सरकार येण्याची खात्री आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपला विनंती केली आहे, की भाजप सरकार आल्यानंतर जुन्या सरकारने लागू केलेल्या योजना बंद करू नयेत. अशोक गेहलोत यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि संपूर्ण राजस्थानच्या जनतेला आश्वासन देतो, की जाणाऱ्या सरकारच्या कोणत्याही जनकल्याणकारी योजना भाजप सरकार बंद करणार नाही. उलट्या योजना आम्ही अधिक कार्यक्षमतेने राबवू कारण ही मोदींची गॅरंटी आहे!!

  पंतप्रधान मोदींनी चित्तोडगड मध्ये हे वक्तव्य करून अशोक गेहलोत यांच्याबरोबरची पॉलिटिकल केमिस्ट्रीच एक प्रकारे जाहीर करून टाकली. राहुल गांधींसह बाकीचे काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मनात असले, तरी अशोक गेहलोत मात्र मोदींबरोबर वेगळी पोलिटिकल केमिस्ट्री राखून आहेत. ते केंद्रातल्या भाजप सरकारला धारेवर धरतात, पण मोदींवर वैयक्तिक पातळीवर बोलताना जपून बोलतात. त्यामुळे मोदींनी देखील आज अशोक गेहलोत यांच्याच एका वक्तव्याचा आधार घेऊन राजस्थानात काँग्रेस सरकार जाईल आणि भाजप सरकार येईल, असे भाकीत वर्तविले. हे भाकीत वर्तविताना त्यांनी काँग्रेस हायकमांडला डिवचले.

  The Chief Minister is confident that the Congress government will go in Rajasthan; But won’t stop their plans, Modi assured!!

  महत्वाच्या बातम्या

  Related posts

  1 जूनपासून लागू होणार नवीन वाहतूक नियम ; सावधान नाहीतर भरावा लागेल 25 हजारांचा दंड!

  भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप प्रथमच 5 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले

  मोदी परत येत आहेत, पण भाजपला किती जागा मिळतील? जाणून घ्या राजकीय चाणक्य ‘पीके’चा अंदाज