संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हा:हा:कार माजलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता महाराष्ट्राच्या मदतीला धावले आहे. महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दोन लाख ६९ हजार २१८ रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत. देशात सर्वाधिक इंजेक्शन महाराष्ट्रालाच मिळणार आहेत.The central government rushed to the aid of Maharashtra and will get 2 lakh 69 thousand remediaries
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हा:हा:कार माजलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता महाराष्ट्राच्या मदतीला धावले आहे. महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दोन लाख ६९ हजार २१८ रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणा आहेत. देशात सर्वाधिक इंजेक्शन महाराष्ट्रालाच मिळणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन महाराष्ट्रासह कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रासह १९ राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरविण्याचे आदेश दिले आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा प्रचंड वेगाने वाढविला आहे.
त्यामुळे येत्या आठ दिवसांत महाराष्टÑाला इंजेक्शन मिळणार आहेत. महाराष्ट्राला सिप्ला कंपनीकडून ९२,४००, झायडस कॅँडेला आणि हेट्रो या कंपन्यांकडून प्रत्येकी ५० हजार, मिलानकडून ३२ हजार, सिनर्जीकडून २३ हजार,ज्युबिलंटकडून १६ हजार, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीकडून ५,८०० इंजेक्शन मिळणार आहेत.
छत्तीसगडला ४८,२५०, दिल्लीला ६१,८२५, गुजरातला १,६३,५५९, हरियाणाला २९,४४१, आंध्र प्रदेशाला ५८,८८१, कर्नाटकाला २५,३५२, मध्य प्रदेशाला ९२,४११, पंजाबला १३,४१२, राजस्थानला २६,१६९, तमीळनाडूला ५८,८८१, उत्तर प्रदेशला १,२२,८३३ आणि उत्तराखंडला १३,५७५ इंजेक्शन मिळणार आहेत.
The central government rushed to the aid of Maharashtra and will get 2 lakh 69 thousand remediaries
महत्त्वाच्या बातम्या
- मास्क न घालण्याचा आदेश देणारा इस्त्राइल बनला जगातील पहिला देश, लसीकरणामुळे ब्रिटनमध्ये कोविडचा वेग घसरला
- ममतादिदींच्या कथनी व करनीमध्ये फरक, जाहीर शब्द फिरवत बुवा – भतिजांनी घेतल्या जाहीर सभा
- गुजरातमध्ये नवे तज्ज्ञ डॉक्टरना आकर्षक मानधन, कोरोना रुग्णांवर होणार खासगी रुग्णालयांत उपचार
- जगप्रिसद्ध ॲपलकडून ऐन कोरोना काळात ‘एअर टॅग’, ‘आयपॅड प्रो’ बाजारात दाखल