• Download App
    राहुल गांधींची न्यूयॉर्कमध्ये मुक्ताफळं; भारताचा स्वातंत्र्यलढा आफ्रिकेत सुरू झाला, गांधी, नेहरू, सुभाषबाबू NRIs होते!!|The central architect of modern India was an NRI, Mahatma Gandhi was an NRI...say rahul gandhi

    राहुल गांधींची न्यूयॉर्कमध्ये मुक्ताफळं; भारताचा स्वातंत्र्यलढा आफ्रिकेत सुरू झाला, गांधी, नेहरू, सुभाषबाबू NRIs होते!!

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : भारतात लोकशाही नसल्याचा ढिंडोरा पिटत परदेशात हिंडणाऱ्या राहुल गांधींनी आज न्यूयॉर्कमध्ये कहर केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत त्यांनी अशी काही मुक्ताफळे उधळली, की ज्यामुळे 140 भारतीयांवर तोंडात बोट घालून चकित व्हायची वेळ आली.The central architect of modern India was an NRI, Mahatma Gandhi was an NRI…say rahul gandhi

    भारतीय स्वातंत्र्यलढा दक्षिण आफ्रिकेत सुरू झाला. तो NRIs नी अर्थात अनिवासी भारतीयांनी चालवला. कारण भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे मुख्य सूत्रधार महात्मा गांधी हे
    NRI होते. पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, सुभाष चंद्र बोस हे सगळे NRIs म्हणजेच अनिवासी भारतीय होते आणि त्यांनी खुल्या मनाने जगातल्या आयडियाज स्वीकारल्या. त्यातून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान केले, असा दावा राहुल गांधींनी केला.



    टिळक गोखले कुठेत?

    राहुल गांधींनी या दाव्यातून एका फटक्यात 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरातील महान स्वातंत्र्य सेनानींना वगळून टाकले. इतकेच नाही तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पितामह दादाभाई नवरोजी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल यांच्यासारख्या स्वातंत्र्यलढ्यातील दिग्गजांना देखील वगळून टाकले. भारतीय स्वातंत्र्यलढा फक्त NRIs नी चालवला आणि तुम्ही सगळे NRIs भारताच्या पुढच्या वाटचालीसाठी योगदान देत आहात, अशा शब्दांत राहुल गांधींनी न्यूयॉर्क मधल्या भारतीयांना “दीपवून” टाकले.

    गांधी, माझे पणजोबा नेहरू, पटेल, आंबेडकर सुभाष बाबू हे त्या काळात इंग्लंडमध्ये आले अमेरिकेत आले आणि तिथून “बेस्ट आयडियाज” त्यांनी भारतात नेल्या आणि त्यामुळे स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला, असा दावाही राहुल गांधींनी केला.

    आत्तापर्यंत राहुल गांधींनी भारतात लोकशाही नसल्याचा इंग्लंड आणि अमेरिकेत धोशा लावला होता. पण त्यांची किमान 15 ते 20 भाषणे मुक्तपणे त्या देशात होऊ शकली यात त्यांना लोकशाहीचे स्वातंत्र्य दिसले नव्हते. पण आता तर भारताचा स्वातंत्र्य लढाच परदेशात सुरू झाला आणि तो अनिवासी भारतीयांनी चालविला, अशी मुक्ताफळे उधळून राहुल गांधींनी कहर केला आहे.

    The central architect of modern India was an NRI, Mahatma Gandhi was an NRI…say rahul gandhi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही