• Download App
    दिलासा : ऑक्सिजन बेडसाठी केंद्राचा मोठा निर्णय ; ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड रुग्णालये उभारणार ! The center take this decission for the oxygen bed

    दिलासा : ऑक्सिजन बेडसाठी केंद्राचा मोठा निर्णय ; ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड रुग्णालये उभारणार

    • १४ उद्योग ज्या ठिकाणी नायट्रोजन संयंत्रांचे ऑक्सिजन संयंत्रांमध्ये रुपांतरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय उद्योग संघांच्या मदतीने ३७ नायट्रोजन संयंत्रांची ऑक्सिजन उत्पादनाची निश्चिती करण्यात आली आहे.

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी केंद्र सरकार अहोरात्र झटत आहे .धडाधड निर्णय घेत केंद्र सरकार या महामारीचा सामना करत आहे. आता ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड रुग्णालये उभारण्याचा मोठा निर्णय मोदींनी घेतला आहे. या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी जवळपास १० हजार ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध होणार आहेत. The center take this decission for the oxygen bed

    देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. सरकार आणि आरोग्य यंत्रणेपुढे गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग थोपवायचा कसा, या दृष्टीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये पंतप्रधानांनी देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या ताज्या आकडेवारीचा आढावा घेतला. त्यानंतर सरकारकडून एक पत्रक जारी करण्यात आले. त्या पत्रकातून सरकार कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नव्याने काही पावले उचलणार आहे, त्याची माहिती देण्यात आली आहे.

    पंतप्रधानांनी नायट्रोजन संयंत्रांना ऑक्सिजन संयंत्रांमध्ये रुपांतरित करण्याचे काम कोणत्या गतीने सुरू आहे, याचाही आढावा घेतला. सध्याच्या घडीला देशाला मेडिकल ऑक्सिजनची नितांत गरज आहे. त्याच अनुषंगाने सरकारने सध्याच्या नायट्रोजन संयंत्रांचे ऑक्सिजन संयंत्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची व्यवहार्यता शोधली आहे. अशा प्रकारच्या विविध संभाव्य उद्योगांची निश्चिती करण्यात आली आहे, ज्या ठिकाणी ऑक्सिजन उत्पादनासाठी संयंत्रांचे रुपांतर केले जाऊ शकते. मेडिकलच्या कामात याची मोठी मदत होऊ शकते, असे पंतप्रधान कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

    The center take this decission for the oxygen bed

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!