• Download App
    मोदीद्वेषात आंधळ्या कॉँग्रेसला समजेना युक्रेन-रशिया संबंधांवर काय घ्यावी भूमिका, आनंद शर्मा- शशी थरुर यांची वेगवेगळ्या दिशेला तोंडे|The blind Congress did not understand the role to be played in Ukraine-Russia relations., Anand Sharma-Shashi Tharoor's views on Ukraine-Russia relations different

    मोदीद्वेषात आंधळ्या कॉँग्रेसला समजेना युक्रेन-रशिया संबंधांवर काय घ्यावी भूमिका, आनंद शर्मा- शशी थरुर यांची वेगवेगळ्या दिशेला तोंडे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय संबंधांतही पक्षीय राजकारण आणून मोदी सरकारला अडचणीत कसे आणायचे हेच कॉँग्रेस पाहत असते. रशिया आणि युक्रेन युध्दाबाबतही कॉँग्रेसकडून हेच सुरू असून विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या प्रश्नावरून राजकारण सुरू केले आहे. मात्र, या द्वेषात आंधळ्या झालेल्या कॉँग्रेसच्या नेत्यांना काय भूमिका घ्यावी, हे समजेनासे झाले आहे. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आणि शशी थरुर यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहे.The blind Congress did not understand the role to be played in Ukraine-Russia relations., Anand Sharma-Shashi Tharoor’s views on Ukraine-Russia relations different

    कॉँग्रेस बसता उठता ज्यांचे गोडवे गाते त्याच पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या अलिप्त राष्ट्र भूमिकेनुसार मोदी सरकारने रशिया किंवा युक्रेनची बाजू घषतलेली नाही. मात्र, यावरून खासदार शशी थरुर यांनी राजकारण सुरू केले आहे. सयुंक्त राष्ट्रांत भारताने घेतलेली तटस्थ भूमिका योग्य नव्हती. हा चुकीचा विचार आहे.



    भारताने स्वत:ला चुकीच्या बाजुने ठेवले असल्याचा आरोप शशी थरुर यांनी केला आहे.मात्र, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी मात्र थरुर यांची भूमिका चुकीची असल्याचे म्हटले आहे. मी जे निवेदन जारी केले ती अधिकृत प्रतिक्रिया आहे. थरूर यांचे भाष्य व्यक्तिगत असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

    कॉँग्रेसमधील गंभीर प्रकृतीचे आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात तज्ज्ञ समजले जाणारे आनंद शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाचीच भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे शांतता स्थापन करण्यासाठी एकत्र येऊन काम करायला हवे. चर्चेच्या माध्यमातून या संकटावर तोडगा काढला पाहिजे, हिच सरकारची भूमिका त्यांनी मांडली आहे.

    दुसºया बाजुला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे सगळे नेते भारतीय विद्यार्थ्यांना तेथून आणण्याबाबत सतत सरकारवर हल्ला करीत आहेत. भारताने कठोर शब्दांत सयुंक्त राष्ट्रांत भूमिका स्पष्ट करायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, यामुळे रशियासोबतचे आपले संबंध ताणले जातील याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. उलट हे संबंध ताणले गेले तर मोदी सरकार अडचणीत येईल, असे कॉँग्रेसला वाटत आहे.

    The blind Congress did not understand the role to be played in Ukraine-Russia relations., Anand Sharma-Shashi Tharoor’s views on Ukraine-Russia relations different

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य