• Download App
    भाजपा आणि कॉँग्रेस आमचे समान शत्रू, कर्नाटकाचे माजी मुख्यंत्री जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केले स्पष्ट|The BJP and the Congress are our common enemies. D. Kumaraswamy made it clear

    भाजपा आणि कॉँग्रेस आमचे समान शत्रू, कर्नाटकाचे माजी मुख्यंत्री जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : भारतीय जनता पक्ष आणि कॉँग्रेस दोघेही आमचे समान शत्रू आहेत. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीत केवळ सहकार्य मागितले आहे. आम्ही निवडणुकीत युती करत नाही आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.The BJP and the Congress are our common enemies. D. Kumaraswamy made it clear

    जनता दल ज्या जागांवर निवडणूक लढवित नाही त्याठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा अशी विनंती येडियुरप्पा यांनी केली आहे. याबाब जनता दलाची (धर्मनिरपेक्ष)भूमिका मंगळवारी स्पष्ट करणार आहे. बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेईन जिथे मी सर्व विषयांवर बोलेन,



    असे सांगून ते म्हणाले मला एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की मी आजवर कुठेही दुसºया पक्षाशी युती करेन असे म्हटलेले नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष (एच डी देवेगौडा) एवढेच म्हणाले की जिथे आम्ही आमचा उमेदवार नाही तेथे काय करायचे ते कुमारस्वामीच ठरवतील.

    काँग्रेस किंवा भाजपने आतापर्यंत जनता दलाचा पाठिंबा मागितलेला नाही. केवळ येडियुरप्पा यांनी दोन वेळा पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.कुमारस्वामी म्हणाले, येडियुरप्पा यांनी असेही स्पष्ट केले आहे की भाजप आणि जेडी(एस) यांच्यात कोणतीही युती नाही. त्यांनी फक्त या निवडणुकीत सहकार्य मागितले आहे. युती म्हणजे उघडपणे समजून घेणे आणि निवडणुकीसाठी पाठिंबा देत प्रचारासाठी जाणे.

    The BJP and the Congress are our common enemies. D. Kumaraswamy made it clear

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी