• Download App
    मानवाधिकारासंबंधी काही लोकांचा पक्षपाती दृष्टिकोन देशाची प्रतिमा बिघडवतो; पंतप्रधानांचा हल्लाबोल। The biased attitude of some people towards human rights tarnishes the image of the country; Prime Minister's attack

    मानवाधिकारासंबंधी काही लोकांचा पक्षपाती दृष्टिकोन देशाची प्रतिमा बिघडवतो; पंतप्रधानांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये काही व्यक्ती आणि तत्वे मानवाधिकारासंबंधी काही विशिष्ट दृष्टिकोन ठेवून चर्चा करतात. यातून देशाची प्रतिमा बिघडते इतकेच नाही तर त्यांचा पक्षपाती दृष्टिकोन देखील मूळ मानवाधिकाराच्या संकल्पनेला धक्का पोहोचवतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तथाकथित लिबरल्सना सुनावले आहे. The biased attitude of some people towards human rights tarnishes the image of the country; Prime Minister’s attack



    राष्ट्रीय मानवाधिकार या संदर्भात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मानवाधिकार यासंबंधीचा दृष्टिकोण नि:पक्षपाती आणि सर्वांसाठी समान असला पाहिजे, अशी आग्रही भूमिका पंतप्रधानांनी मांडली. पंतप्रधान मोदी म्हणाले, की देशात गेल्या काही वर्षांमध्ये एक गोष्ट दिसून आली आहे की काही लोक त्यांच्या वैयक्तिक आणि स्वतःच्या गटाच्या हितासाठी मानवाधिकाराची व्याख्या आणि व्याप्ती सीमित करून ठेवतात. त्याच्याकडे राजकीय चष्म्यातून बघतात.

    एकाच घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची सवय आहे. एका घटनेत त्यांना मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते, पण तशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेत त्यांना मानवाधिकाराचे उल्लंघन दिसत नाही. असा दुटप्पी दृष्टिकोन ते बाळगतात आणि त्यातून देशाची प्रतिमा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर बिघडवतात, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी लिबरल्सवर हल्ला चढविला. मानवाधिकार संबंधात केंद्र सरकारची भूमिका नि:पक्षपाती आणि सर्वांसाठी समान असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

    भारत स्वतंत्र झाल्यानंतर गेल्या कित्येक दशकांपासून भारतातल्या मुस्लिम महिला ट्रिपल तलाक पासून मुक्ती मागत होत्या. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी ट्रिपल तलाक विरोधातला कायदा करून मुस्लिम महिलांना अधिकार प्रदान केले. त्याचबरोबर हाज यात्रेत त्यांना महरमचे बंधन होते. त्या बंधनातून देखील केंद्र सरकारने मुस्लिम महिलांना मुक्त केले, याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून करून दिली.

    The biased attitude of some people towards human rights tarnishes the image of the country; Prime Minister’s attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी