• Download App
    दिवाळी स्पेशल; "करे नारी से खरीदारी"; आवाहनाला आनंद महिंद्रा यांचा सकारात्मक प्रतिसाद!! That’s a clarion call that no one can ignore. And our tribe applauds this initiative.

    दिवाळी स्पेशल; “करे नारी से खरीदारी”; आवाहनाला आनंद महिंद्रा यांचा सकारात्मक प्रतिसाद!!

    प्रतिनिधी

    मुंबई : यंदाच्या दिवाळीच्या मोसमात आता चिनी उत्पादने मागे पडलेली असताना भारतीय उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. बाजारात ग्राहक आवर्जून भारतीय उत्पादने मागत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील “व्होकल फाॅर लोकल” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.That’s a clarion call that no one can ignore. And our tribe applauds this initiative.

    आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या संपूर्ण भारतीय समाजाला “करे नारी से खरीदारी”, असे आवाहन करताना दिसत आहेत. आनंद महिंद्रा यांनी त्यावर हे आवाहन आपण दुर्लक्षित करू शकत नाही, अशा स्वरूपाची कमेंट केली आहे. इतकेच नाहीतर त्यावर त्यांनी “नन्ही कली” असा हॅशटॅगही लावला आहे.

    आनंद महिंद्रा आहे नेहमीच अभिनव कल्पना उचलून धरताना दिसतात. सोशल मीडियावर देखील ते या अभिनव कल्पनांना प्रचार प्रसारही करताना दिसतात. “व्होकल फाॅर लोकल” या केंद्र सरकारच्या धोरणाला देखील त्यांनी असाच सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसतो आहे.

    That’s a clarion call that no one can ignore. And our tribe applauds this initiative.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??