या हल्ल्यात 29 जण जखमी झाले असून, यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Pakistan पाकिस्तानमधून पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर आली आहे. गुरूवारी उत्तर-पश्चिम पाकिस्तानच्या आदिवासी भागात एका प्रवासी वाहनावर झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्यात 38 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अनेकलोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.Pakistan
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्रममधील पाराचिनार येथून ताफ्यातील प्रवासी व्हॅनला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. खैबर पख्तूनख्वाचे मुख्य सचिव नदीम अस्लम चौधरी यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्य सचिव नदीम अस्लम चौधरी यांनी हल्ल्यानंतर सांगितले की, गुरुवारी उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील आदिवासी भागात बंदूकधाऱ्यांनी प्रवासी वाहनांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत.
Terrorists open fire on passenger vehicle in Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Exit Poll महाराष्ट्रात 11 पैकी 6 एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार, झारखंडमध्ये 8 पैकी 4 पोलमध्ये भाजपला बहुमत
- Agniveer : राजस्थानच्या अग्निवीरला प्रथमच शहीद दर्जा; दहशतवाद्यांनी डोक्यात झाडली होती गोळी; पॅरा स्पेशल फोर्समध्ये होते
- Exit Poll : आकड्यांच्या जंजाळापलीकडचे सत्य; हिंदू एकजुटीत फूट पाडणाऱ्या जातीय अजेंड्यावर महाराष्ट्राची मात!!
- Prime Minister Modi आता गयाना आणि बार्बाडोसही देणार पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान