नाशिक : दहशतवादी देशाच्या शिफारशीवर, ट्रम्पचा दावा नोबेलवर!!, असे अमेरिकेच्याही इतिहासातले रसातळाचे राजकारण आज घडले. अमेरिकेनेच शस्त्रास्त्रे देऊन पोसलेलेल्या पाकिस्तान सारख्या मंडलिक राष्ट्राने अमेरिकेच्या अध्यक्षाला नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी शिफारस पत्र दिले. आणि ते मिळवणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
दहशतवादी देश पाकिस्तानने अधिकृतपणे डोनाल्ड ट्रम्प यांची शिफारस नोबेल शांतता पुरस्कारासाठी केली. दहशतवादी देश पाकिस्तानचा स्वयंघोषित फील्ड मार्शल असीम मुनीर याला डोनाल्ड ट्रम्प यांनी diplomatic lunch दिले. त्या बदल्यात त्यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी भूमी वापरायची “परवानगी” मिळविली. त्याचबरोबर दहशतवादी देश पाकिस्तानी सरकारकडून नोबेल पुरस्कारासाठी शिफारस पत्र देखील मिळविले. अमेरिकेच्या 300 वर्षांच्या इतिहासात एवढी मोठी “ऐतिहासिक घटना” कधी घडली नव्हती. एका मंडलिक देशाकडून नोबेल पुरस्कारासाठी शिफारस झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कारकीर्दीत अनेक “ऐतिहासिक गोष्टी” केल्या. त्यांनी out of the way जाऊन ब्युटीफुल बिल आणले. हार्वर्ड मधून परदेशी विद्यार्थ्यांना हाकलले. विद्यापीठावर निर्बंध लादले. पण विद्यापीठाने ते लगेच धुडकावले. Make in America ही संकल्पना जागतिक कंपन्यांवर लादून त्यांचा धंदा बसविण्याचा उद्योग चालविला. पण त्या पलीकडे जाऊन भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीचे त्यांनी तब्बल 16 वेळा तोंडी credit घेतले. भारतातल्या काँग्रेसला राजकीय इंधन पुरविले. त्यासाठी ते I love Pakistan म्हणाले.
एवढ्या सगळ्या “ऐतिहासिक गोष्टी” केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादी देश पाकिस्तानकडून स्वतःची पाठ थोपटून घेतली. पाकिस्तानच्या सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करणारे अधिकृत पत्र नोबेल समितीला पाठविले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी आपला प्रचंड प्रभाव वापरला. त्यांच्यामुळेच दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये शस्त्रसंधी घडून आली, अशी स्तुतीसुमने पाकिस्तानी सरकारने नोबेल शिफारस पत्रात लिहिली.
– पाकिस्तानी पंतप्रधानाला कोलले तरी…
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर याला diplomatic lunch दिल्याबद्दल पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ याने आनंद व्यक्त केला. पाकिस्तानी नागरिक सरकारचा प्रमुख म्हणून आपण स्वतः त्या diplomatic lunch ला हजर नव्हतो. किंबहुना डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळा आंतरराष्ट्रीय protocol तोडून आपल्याला वगळून फक्त पाकिस्तानी लष्करी सर्वोच्च नेत्याला diplomatic lunch दिला याविषयी शहाबाज शरीफ याने कुठलीही खंत व्यक्त केली नाही. उलट असीम मुनीर याने अजून आपल्याला पंतप्रधान पदावर “ठेवले.” त्याने लष्करी बंड करून आपले सरकार उलटवून टाकले नाही, याविषयी “समाधानच” व्यक्त केले.
Terrorist country Pakistan recommends Donald Trump for nobel peace prize
महत्वाच्या बातम्या
- Yoga Day 2025 आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५: पंतप्रधान मोदी आज विशाखापट्टणममध्ये, तर अमित शहा अहमदाबादमध्ये
- अखेर मोदींनी स्वत:च सांगितलं अमेरिकेस न जाण्यामागचं नेमकं कारण!
- Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चीनला जाणार ; पाकिस्तानचे संरक्षणमंत्रीही समोर असणार
- Sheikh Hasina : सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये मिळाला शेख हसीना यांना मोठा दिलासा