• Download App
    बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर दहशतवाद्यांचा हल्ला, पाच सैनीक ठार Terrorist attack on pak army in Baluchistan

    बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर दहशतवाद्यांचा हल्ला, पाच सैनीक ठार

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – बलुचिस्तानच्या सिबी जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात पाच सैनिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान सशस्त्र दलांच्या प्रसिद्धी खात्याने या चकमकीत दहशतवाद्यांची मोठी जिवीत हानी झाल्याचा दावा केला, पण किती जण मारले गेले याचा तपशील दिला नाही. Terrorist attack on pak army in Baluchistan

    पाकिस्तानचे गृह मंत्री शेख रशीद अहमद यांनी या हल्ल्याचा निषेध केला, तर विरोधी पक्षनेते शाहबाझ शरीफ यांनी बलुचिस्तानामधील वाढत्या सामाजिक उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली. तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारावी म्हणून तातडीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

    दहशतवाद्यांच्या शस्त्रास्त्र व इतर सामग्रीचेही मोठे नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले. दहशतवाद्यांना पळून जाता येऊ नये म्हणून त्या विभागात शोधमोहिम सुरु करण्यात आली.

    Terrorist attack on pak army in Baluchistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal Voter List : पश्चिम बंगालची अंतिम मतदार यादीची तारीख बदलू शकते, आयोगाने म्हटले- 14 फेब्रुवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार काम पूर्ण होणे कठीण

    Karnataka Governor : कर्नाटक राज्यपालांचा संयुक्त अधिवेशन संबोधित करण्यास नकार; मंत्र्यांनी भेट घेतली

    India to Deploy : भारत अवकाशात बॉडीगार्ड सॅटेलाइट तैनात करणार; रिअल-टाइम इंटेलिजन्समुळे सैन्याला मदत