• Download App
    TERRORIST ATTACK:मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह ५ जवान शहीद; पत्नी आणि मुलाचाही मृत्यू|TERRORIST ATTACK: 5 jawans including army officer martyred in Manipur terror attack;Death of wife and child

    TERRORIST ATTACK:मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह ५ जवान शहीद; पत्नी आणि मुलाचाही मृत्यू

    मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथील घटना. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.TERRORIST ATTACK: 5 jawans including army officer martyred in Manipur terror attack;Death of wife and child


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या तुकडीवर आयईडी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दहशतवादी जवानांवर हल्ला करण्यासाठी परिसरात दबा धरून बसले होते. जवान टप्प्यात येताच त्यांनी जवानांवर हल्ला केला.

    या हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे अनेक जवान जखमी झाले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशानं पाच धाडसी वीर गमावल्याची भावना व्यक्त करत यासंदर्भात ट्विट केलं आहे



    मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथे ही घटना घडली. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये कमांडिंग ऑफिसर त्यांची पत्नी, मुलगा ,शीघ्र कृतीदलाचे जवान होते. कमांडिंग ऑफिसर सह आसाम रायफल्सचे चार जवान आणि कमांडिंग ऑफिसरच्या पत्नीचा आणि मुलाचा  मृत्यू झाला आहे.

    सर्च ऑपरेशनला सुरुवात

    दरम्यान, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आता जवानांकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

    पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूरचा हात?

    पीपल्स लिबरेशन ऑफ मणिपूर संघटनेचा हात असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्याप अधिकृतीरित्या कुठल्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मणिपूरमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली होती.

    भारत सरकारनं या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. ही संघटना भारतीय सुरक्षा दलांवर हलेल करते. या संघटनेची स्थापना बिश्वेवर सिंह यांनी केली होती.

    TERRORIST ATTACK: 5 jawans including army officer martyred in Manipur terror attack;Death of wife and child

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!