• Download App
    भारताची स्टार सानिया मिर्झाचे हंगामातील पहिले जेतेपद, Ostrava Open मध्ये चीनच्या झांगसह डबल्स चॅम्पियन । Tennis Star Sania Mirza along with partner Shuai Zhang clinched the medal at WTA 500 Ostrava Open

    भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे हंगामातील पहिले जेतेपद, Ostrava Open मध्ये चीनच्या झांगसह डबल्स चॅम्पियन

    Ostrava Open : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी या मोसमातील तिचे पहिले विजेतेपद पटकावले. सानियाने या हंगामात ओस्ट्रावा ओपनमध्ये महिला दुहेरीची फायनल जिंकून आपले खाते उघडले. सानियाने तिची चिनी जोडीदार शुई झांगसह हे विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सानिया आणि झांग या द्वितीय क्रमांकाच्या जोडीने एक तास आणि चार मिनिटे चाललेल्या सामन्यात अमेरिकेच्या क्रिस्टियन आणि न्यूझीलंडच्या रोटलिफ या तिसऱ्या मानांकित अमेरिकन जोडीविरुद्ध 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. Tennis Star Sania Mirza along with partner Shuai Zhang clinched the medal at WTA 500 Ostrava Open


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी या मोसमातील तिचे पहिले विजेतेपद पटकावले. सानियाने या हंगामात ओस्ट्रावा ओपनमध्ये महिला दुहेरीची फायनल जिंकून आपले खाते उघडले. सानियाने तिची चिनी जोडीदार शुई झांगसह हे विजेतेपद पटकावले. स्पर्धेत सानिया आणि झांग या द्वितीय क्रमांकाच्या जोडीने एक तास आणि चार मिनिटे चाललेल्या सामन्यात अमेरिकेच्या क्रिस्टियन आणि न्यूझीलंडच्या रोटलिफ या तिसऱ्या मानांकित अमेरिकन जोडीविरुद्ध 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला.

    या मोसमात सानियाने दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. महिन्यापूर्वी सानियाने अमेरिकेतील तिची जोडीदार चिर्स्टिना मचालेसह डब्ल्यूटीए 250 क्लीव्हलँड स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सानिया आणि तिच्या जोडीदाराला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

    20 महिन्यांनंतर सानियाचे जेतेपद

    34 वर्षीय सानिया मिर्झाने 20 महिन्यांनंतर डब्ल्यूटीए जेतेपद पटकावले आहे. तिने जानेवारी 2020 मध्ये होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. रविवारी ओस्ट्रावा ओपनमधील विजयासह सानियाच्या डबल्स चॅम्पियनचा आकडा 43 वर पोहोचला आहे.

    सानिया आणि झांगने जपानच्या इरी होझुमी आणि मकोतो निनोमिया या चौथ्या मानांकित जोडीला ऑस्ट्रावा ओपनच्या उपांत्य फेरीत 6-2, 7-5 ने सरळ सेटमध्ये पराभूत केले.

    Tennis Star Sania Mirza along with partner Shuai Zhang clinched the medal at WTA 500 Ostrava Open

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही