• Download App
    आंध्रात चुनखडीच्या खाणीत भीषण स्फोट, दहा मजूर जागीच ठार।Ten people died in blast

    आंध्रात चुनखडीच्या खाणीत भीषण स्फोट, दहा मजूर जागीच ठार

    विशेष प्रतिनिधी

    कडप्पा : आंध्र प्रदेशातील चुनखडीच्या खाणीत झालेल्या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अडकले आहेत. स्फोटामागचे नेमके कारण समजू शकले नाही. Ten people died in blast

    चुनखडीच्या खाणीत कामगार नेहमीप्रमाणे दगड फोडण्याचे काम करत असताना अचानक मोठा स्फोट झाला. त्यात दहा जण जागीच ठार झाले तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याचे सांगितले जात आहे. ग्रेनाईडमध्ये ड्रिलिंग करत असताना स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



    घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या असल्याने त्याची तीव्रता खूप होती. खाणीतील स्फोटाचा आवाज ऐकून गावातील लोक घराबाहेर आले. खाणीतून मोठा धूर बाहेर पडताना पाहिला. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस आणि बचाव पथकाने जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढून त्यांना दवाखान्यात नेण्यात आले.

    जिल्हा प्रशासनाचे अधिकारी खाणीतील स्फोटाची चौकशी करत आहेत. चुनखडीच्या खाणीत आणखी काही कामगार असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मामिलपल्ली गावाजवळील अनेक खाणीत विनापरवाना उत्खनन करण्यात येते, परंतु संबंधित खाणीत उत्खननाला परवानगी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    Ten people died in blast

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Govt : केंद्र सरकारने महागाई भत्ता 2% ने वाढवला; 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल फायदा

    Rahul Gandhi : राहुल गांधींवरील FIRचा स्वतःचाच आदेश हायकोर्ट जजनी बदलला; नोटीसशिवाय FIR योग्य मानले नाही;

    Meta : मेटाचा 8,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीचा प्लॅन:20 मेपासून; कर्मचारी कपात प्रक्रिया सुरू होईल; जागतिक स्तरावर 10% कर्मचारी कमी होतील