विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्री य उद्यानात चित्त्यांची डरकाळी पुन्हा घुमणार आहे. नोव्हेंबर महिन्यात येथे दक्षिण आफ्रिकेतून दहा चित्त्यांचे आगमन होणार आहे. १९५२ मध्ये चित्ता देशातून नामशेष झाल्याची जाहीर करण्यात आले होते. Ten chitta will brought from Affrica to India
राज्याचे वनमंत्री विजय शहा यांनी ही माहिती नुकतीच दिली. अंगावर ठिपके असलेल्या चित्त्याचे शेवटचे दर्शन १९४७ मध्ये मध्य प्रदेशातील कोरिया भागात झाले होते. शहा म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतून दहा चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येणार आहे. त्यात पाच नर व पाच मोदी असतील. चित्त्यांसाठी राष्ट्रीय उद्यानात विशेष विभाग बनविण्याचे काम सुरू करण्यात आले असून ऑगस्ट महिन्यात ते पूर्ण होणार आहे.
कुनो राष्ट्रीय उद्यान सुमारे ७५० वर्ग किलोमीटर एवढे क्षेत्रावर पसरलेले आहे. चित्त्यांच्या अधिवासासाठी हे सुयोग्य ठिकाण मानले जाते कारण येथे चित्यांसाठी मुबलक भक्ष्य उपलब्ध आहे. या जंगलात हरणे, चिंकारा, नीलगाय, सांबर आणि चितळांची मोठी संख्या आहे. अधिवासासाठी अर्थसंकल्पात १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.