• Download App
    तर जीभ कापून टाकू ; CM चंद्रशेखर राव यांची भाजप नेत्यांना धमकी...TELANGANA:'We'll cut your tongues': KCR issues warning to Telangana BJP leaders

    TELANGANA …तर जीभ कापून टाकू ; CM चंद्रशेखर राव यांची भाजप नेत्यांना धमकी…

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद: इंधनाच्या किमती, केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे यावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भाजपवर टीका करताना जीभ चांगलीच घसरली . भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर अनावश्यक टीका केल्यास त्यांची जीभ छाटून टाकू असं वक्तव्य तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. TELANGANA:’We’ll cut your tongues’: KCR issues warning to Telangana BJP leaders

    हैदराबादमध्ये बोलत असताना चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधात अत्यंत आक्रमक भूमीका घेताना दिसून आले. यावेळी त्यांनी आमच्यावर अनावश्यक टीका करू नका म्हणत भाजप कार्यकर्त्यांना धमकावले.



    तिकडे चीन अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्यावर हल्ला करतंय आणि केंद्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारलाही धारेवर धरलं आहे.

     

    तसेच पूढे बोलताना ते असंही म्हणाले की, तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. भाजपने 7 वर्षात काय केले? भारताचा जीडीपी बांगलादेश, पाकिस्तानपेक्षा कमी आहे आणि केंद्राने विनाकारण कर वाढवला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दल देखील केंद्र सरकार खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. 2014 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती 105 यूएस डॉलर होत्या आणि आता 83 यूएस डॉलर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्या असल्याचे सांगत भाजप जनतेशी खोटं बोलल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

    TELANGANA:’We’ll cut your tongues’: KCR issues warning to Telangana BJP leaders

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत