• Download App
    पक्षाचे नाव TRS वरून BRS, करताना KCR यांना मिळाली कुमारस्वामींची साथ!Telangana Rashtra Samiti is now Bharat Rashtra Samithi

    पक्षाचे नाव TRS वरून BRS, करताना KCR यांना मिळाली कुमारस्वामींची साथ!

    • नव्या पक्षासह राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : KCR news Party BRS: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव KCR यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) करून राष्ट्रीय राजकारणात उडी घेताना त्यांना पहिली साथ मिळाली आहे, ती कर्नाटकातून माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची!! Telangana Rashtra Samiti is now Bharat Rashtra Samithi

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) केले आहे, पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संयुक्त आघाडी स्थापन करण्यासाठी केसीआर यांनी अनेक विरोधी नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर टीआरएसचे नाव बदलून बीआरएस करण्याचा निर्णयाची अधिकृत घोषणा बुधवारी विजयादशमीला केली.

    पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी टीआरएस नवीन पक्षात विलीन करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर हे नवीन नाव पुढे आले. नवीन पक्षाच्या राष्ट्रीय नामकरण कार्यक्रमात, जेडी(एस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि त्यांच्या 20 आमदारांनी टीआरएस मुख्यालयात हजेरी लावली. या नवीन नावाने केसीआर यांनी 2024 मध्ये राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची आपली महत्त्वाकांक्षा दर्शवली आहे.

     

    अस्तित्वात आल्यानंतर, बीआरएस हा दोन तेलुगू राज्यांमधील पहिला प्रादेशिक पक्ष असेल ज्याचे राष्ट्रीय पक्षात रूपांतर होईल. नवीन पक्ष बीआरएसच्या निर्णयाचा टीआरएस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. केसीआर यांच्या नव्या राष्ट्रीय पक्षाच्या घोषणेने टीआरएस समर्थकांमध्ये उत्साह आहे. केसीआर समर्थक हातात अनेक बॅनर आणि पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरताना दिसत होते. त्यावर देशाचे नेते केसीआर असे लिहिले होते.

    Telangana Rashtra Samiti is now Bharat Rashtra Samithi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    जीवघेणा वेग! अमेरिकेत भीषण रस्ते अपघातात तीन भारतीय महिलांचा मृत्यू

    मणिपूरमध्ये सीआरपीएफचे 2 जवान शहीद; कुकी अतिरेक्यांनी मैतेई गावात सेंट्रल फोर्स पोस्टवर बॉम्ब फेकले, 2 जवान जखमी

    सुप्रीम कोर्टात याचिका- NOTA ला जास्त मते पडल्यास निवडणूक रद्द करावी; निवडणूक आयोगाला नोटीस