• Download App
    तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी|Telangana Chief Minister threatens BJP leaders to cut out their tongues

    तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी

    विशेष प्रतिनिधी

    हैद्राबाद :राज्यात प्रचंड बहुमताने निवडून आल्यावर पोटनिडणुकीत पराजय पत्करावा लागल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव बिथरले आहेत. भाजपच्या नेत्यांना जिभच कापून टाकू अशी धमकी दिली आहे.Telangana Chief Minister threatens BJP leaders to cut out their tongues

    राव यांनी म्हंटले आहे की, केंद्राकडून सांगितलं जातंय की धान्य खरेदी केली जाणार नाही. मात्र, राज्यातील भाजप प्रमुख शेतकऱ्यांना धान्य खरेदीचं आश्वासन देत आहेत. ‘राज्य सरकारबद्दल गैरजरुरी आणि बेजबाबदार वक्तव्य केलीत तर जीभ कापून टाकू. ‘केंद्रानं धान्य खरेदी करणार नसल्याचं सांगितलंय.



    याच कारणामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तोटा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी इतर पिकं घेण्याचा सल्ला दिलाय. राज्यानं खरेदी केलेले तांदूळ घेण्यासाठी मी थेट केंद्रीय मंत्र्यांना जाऊन भेटलो होतो. तेव्हा त्यांनी लवकरच याबद्दल निर्णय घेऊन सूचना देऊ असं म्हटलं होतं. मात्र, आतापर्यंत त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही.

    तेलंगणा राज्याकडे अगोदरपासूनच गेल्या वर्षीचं जवळपास पाच लाख टन धान्य पडून आहे. परंतु, हे धान्य खरेदी करण्याची केंद्राची तयारी नाही. केंद्राचा हा व्यवहार अतिशय बेजबाबदार आहे.बांडी संजय म्हणतात की ते मला तुरुंगात धाडणार आहेत. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी मला हात लावून दाखवावाच असा इशाराही राव यांनी दिला आहे.

    Telangana Chief Minister threatens BJP leaders to cut out their tongues

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jyoti Malhotra : हिसारची यूट्यूबर ज्योती तुरुंगातून बाहेर येणार नाही; जामीन अर्ज फेटाळला, कोर्टाने म्हटले- तपासावर परिणाम होऊ शकतो

    Tamil Nadu : कोट्यवधींच्या इरिडियम व्यवहारप्रकरणी तामिळनाडूमध्ये 27 जणांना अटक; CBCIDने ग्राहक असल्याचे भासवून कारवाई केली

    ST Corporation, : कुर्नूल बस दुर्घटनेनंतर एसटी महामंडळ सतर्क; ‘स्लीपर बस प्रवासी सुरक्षा’ अभियान सुरू, प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी