• Download App
    ‘’…तेजस्वी यादव यांनी माफियाचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत’’- गिरीराज सिंह भडकले! Tejaswi Yadav should put mafia photos in his office Giriraj Singh 

    ‘’…तेजस्वी यादव यांनी माफियाचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत’’- गिरीराज सिंह भडकले!

    उमेश पाल यांच्या हत्येनंतर त्यांनी एक शब्दही काढला नव्हता, ते आता दु:खात का आहेत? असा सवालही केला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. अतिक अहमदच्या मृत्यूनंतर तेजस्वी यादव यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी  हल्ला चढवला आहे. तेजस्वी यादव यांनी माफियाचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावावेत, असे गिरीराज सिंह म्हणाले. ” Tejaswi Yadav should put mafia photos in his office Giriraj Singh

    गिरिराज सिंह म्हणाले, “मी सल्ला देईन की बिहारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयात पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) आणि माफियाची छायाचित्रे लावावीत.’’ तसेच त्यांनी म्हटले की, ‘’या अगोदर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ओसामा बिन लादेनला ओसाजी म्हटले होते. मतांसाठी हे लोक काहीही करू शकतात. उमेश पाल यांच्या हत्येनंतर त्यांनी एक शब्दही काढला नव्हता, ते आता दु:खात का आहेत?’’

    तेजस्वी यादव यांनी ‘अतिक जी’ म्हटले होते –

    प्रयागराजमध्ये अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर तेजस्वी यादव यांनी मीडियाशी संवाद साधताना अतिकला ‘अतीक जी’ असे संबोधले. ते म्हणाला होते, “हा अतीकजीचा मृत्यू नाही, तर उत्तर प्रदेशातील कायद्याचा मृत्यू आहे.” शनिवारी रात्री अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ मीडियाशी बोलत असताना तिघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या करण्यात आली. जेव्हा पोलीस त्याला मेडिकलसाठी घेऊन जात होते.

    Tejaswi Yadav should put mafia photos in his office Giriraj Singh

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य