विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सनातन धर्माला मलेरिया, डेंगीचे लांछन लावणाऱ्या उदयनिधी स्टालिन यांचा “ताप” तहसील पूनावाला यांनी उतरवला. आपल्या ट्विटर हँडल वरून तहसीन पूनावाला यांनी हिंदू धर्माची विशेषताच उदयनिधी स्टालिन यांना सुनावली. Tehseen poonawalla exposed udayanidhi stalin over his hate speech remarks on sanatan dharma
सनातन धर्म म्हणजे मलेरिया, डेंगी आणि कोरोना असल्याचे लांछन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी लावले होते. सनातन धर्माचे निर्मूलन करण्याची भाषा त्यांनी वापरली होती. त्यावर तामिळनाडूमध्ये प्रचंड संताप उसळला. उदयनिधींना सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केले, पण त्या पलीकडे जाऊन सनातन धर्माची वैशिष्ट्ये अधोरेखित करत तहसीन पूनावाला यांनी उदयनिधी स्टालिन यांचा निषेध केला आणि नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान करणाऱ्या राहुल गांधींना काही बोचरे सवाल केले.
सनातन धर्माइतका वैविध्य आणि वैशिष्ट्य असणारा दुसरा धर्म नाही. ती एक जीवन पद्धती आहे. तो सर्वांना सामावून घेणारा धर्म आहे. सनातन धर्माने आत्तापर्यंत अनेक सुधारणा केल्या आणि पचविल्या आहेत. सनातन धर्माचे लोक भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांची पूजा करतात हे दोघेही ब्राह्मण नव्हते. उलट रामाने तर रावण नावाच्या ब्राह्मणाला मारले तरी देखील रामाची पूजा होते. रामाचा जन्मोत्सव साजरा होतो. पण उदयनिधी स्टालिन यांनी स्वतःचे राजकारण साधून घेण्यासाठी सनातन धर्माविषयी बेलगाम उद्गार काढले, हे देशातली जनता कधीही सहन करणार नाही.
राहुल गांधींना परखड सवाल
उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याचा हवाला देऊन तहसील पूनावाला यांनी राहुल गांधींना प्रश्न विचारले आहेत. ते नफरतच्या बाजारात मोहब्बतचे दुकान उघडून बसले आहेत. पण त्यांना उदयनिधी स्टालिन यांचे “हेट स्पीच” दिसत नाही का?? अशाच आशयाचे उद्गार एखाद्या भाजपच्या नेत्याने मुस्लिम किंवा अन्य धर्माविषयी काढले असते तर त्याला त्यांनी “हेट स्पीचचे” लेबल लावले नसते का?? कोणत्याही धर्माविरुद्ध असले उद्गार हे हेट स्पीच मानले पाहिजे, असा निर्वळ सुप्रीम कोर्टाने दिला आहे. खुद्द काँग्रेस पक्षात अनेक जण सनातनधर्मीय आहेत. पी. चिदंबरम यांचे चिरंजीव तामिळनाडूतले खासदार कार्ती चिदंबरम तरी उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याला पाठिंबा देतील का??, असा परखड सवालाही तहसीन पूनावालांनी केला.
त्यामुळे आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याचा निषेध करावा किंवा त्याचा खुलासा करावा, अशी आग्रही मागणी तहसील पूनावाला यांनी केली.
Tehseen poonawalla exposed udayanidhi stalin over his hate speech remarks on sanatan dharma
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- इथेनॉल इफेक्ट : तेल आयातीतून 53894 कोटी रुपये वाचले; शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले!!
- आधी पोलिसांवर दगडफेक, 12 पोलीस जखमी, त्यानंतर जालन्यात लाठीमार; फडणवीसांचा स्पष्ट खुलासा
- Aditya-L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘ISRO’ आज लॉन्च करणार ‘आदित्य एल 1’; जाणून घ्या वेळ