वृत्तसंस्था
मेलबर्न : टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरला. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. Team India’s Diwali gift to Indians; Pakistan lost in the first T20 match
टीम इंडियाला पाकिस्तानकडून 160 रन्सचं आव्हान मिळालं होतं. पाकिस्तानचीही फलंदाजी करताना फारशी चांगली सुरुवात झाली नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पहिल्याच चेंडूवर शून्यावर पायचीत अर्शदीपने तंबूचा मार्ग दाखवला. सलामीवीर मोहम्मद रिझवानही जास्त वेळ टिकला नाही. 4 धावांवर असताना अर्शदीपने सेट अप लावत आपल्या जाळ्यात अडकवलं. 15 धावांवर पाकिस्तानचे दोन गडी बाद झाले होते.
शमीनंतर हार्दिकने शादाब 5, हैदर अली 2, मोहम्मद नवाझ 9 यांना माघारी पाठवले. दुसरीकडे शान मसूदने शेवटपर्यंत नाबाद राहत एक बाजू लावून धरली होती, त्याने 52 धावा केल्या. शेवटला शाहिन आफ्रिदीने एक चौकार आणि 1 षटकार मारत 16 धावा केल्या. भारताच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीम इंडियाची खराब सुरुवात
टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब सुरुवात झाली. ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल अवघ्या 4 रन्सवर करुन बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमारने काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र त्यालाही यामध्ये यश मिळाले नाही. तो 15 रन्स करुन आऊट झाला. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरत तडाखेबंद खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.
Team India’s Diwali gift to Indians; Pakistan lost in the first T20 match
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वी आणि दौऱ्यानंतर राजकारण बेरजेचं की वजाबाकीचं?
- ऐतिहासिक ताजमहाल होणार अतिक्रमण मुक्त; सीमेअंतर्गत 500 मीटर व्यवसाय बंदी करणार लागू
- गुमनामी बाबा की नेताजी? : गुमनामी बाबांचा DNA रिपोर्ट सार्वजनिक करायला केंद्रीय फॉरेन्सिक लॅबचा नकार
- फोडा – फोडी, बुडवा – बुडवी राजी – नाराजी; ही तर महापालिका निवडणुकांपूर्वीची खडाखडी