• Download App
    तालिबानने अमेरिकेला पुन्हा धमकावले, सुटका मोहीम तातडीने संपवण्याच मागणी । Taliban gave ultimatum to USA

    तालिबानने अमेरिकेला पुन्हा धमकावले, सुटका मोहीम तातडीने संपवण्याची मागणी

    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तानातील नागरिकांच्या सुटका मोहिमेवरून तालिबानने अमेरिकेला पुन्हा धमकावले असून ३१ ऑगस्टच्या अखेरपर्यंत ही मोहीम संपवावी असा सूर त्यांनी आळवला आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेसह अन्य देशांचे हजारो नागरिक आणि सैनिक अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेने ही सुटका मोहीम तातडीने संपवावी अशी धमकी तालिबानकडून देण्यात आली आहे. Taliban gave ultimatum to USA

    सध्या काबूलमधील हमीद करझाई विमानतळावर अमेरिकेचे ५ हजार ८०० सैनिक तैनात आहेत. ही मोहीम लवकरात लवकर संपुष्टात आणण्याचा आमचा इरादा असून प्रत्येक दिवशी येथील धोका वाढत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.



    याबाबत बोलताना अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की ‘‘युरोपीय नेत्यांकडून जास्तीचा वेळ मागितला जात असला तरीसुद्धा या सुटका मोहिमेबाबतच्या डेडलाइनसाठी बायडेन कटिबद्ध आहेत.’’ अमेरिकी गुप्तचरसंस्था ‘सीआयए’ने मध्यंतरी तालिबानी नेतृत्वाची काबूलमध्ये भेट घेऊन चर्चाही केली होती. यावरूनच ही सुटका मोहीम अमेरिकेच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे हे दिसून येते.

    काबूल विमानतळाबाहेरील गर्दी वाढत असल्याने अमेरिकेच्या चिंता वाढल्या आहेत. अनेकवेळा गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अमेरिकेला गोळीबार देखील करावा लागला. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिदने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की ‘‘ अमेरिकेने सुटका मोहिमेची डेडलाईन पाळणे गरजेचे आहे. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर आम्ही एकाही नागरिकाला येथून बाहेर पडू देणार नाही.’’

    Taliban gave ultimatum to USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ममता बॅनर्जी पुन्हा झाल्या जखमी! हेलिकॉप्टरमध्ये चढताना…

    ओवैसींच्या चिंतेत भर, भाजपच्या माधवी लता मुस्लिमांमध्येही प्रचंड लोकप्रिय, हैदराबादेत आव्हान

    शिवराज सिंह चौहान यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्हं!