• Download App
    भारताचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्या; राहुल गांधी यांची चक्क अमेरिकेकडे मागणी |Take the initiative to solve India's problems; Rahul Gandhi's demand for America

    भारताचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्या; राहुल गांधी यांची चक्क अमेरिकेकडे मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अमेरिका हा सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. त्यामुळे अमेरिकेने कृषी आंदोलनासारख्या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.
    भारताला वाचवा, अशी भीक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेकडे मागितली आहे, असे ट्विट शेफाली वैद्य यांनी केले आहे.Take the initiative to solve India’s problems; Rahul Gandhi’s demand for America

    शेफाली वैद्य यांनी राहुल गांधी यांची एक व्हीडिओ क्लिप पुरावा म्हणून सादर केली आहे. त्यात राहुल गांधी हे अमेरिकेच्या घटनेचे आणि उदात्त लोकशाहीचे कौतुक करताना दिसत आहेत. या शिवाय या माध्यमातून भारताला वाचवावे, अशी भीक ते मागत असल्याचे दिसत आहेत.



    राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान बनावेत, अशी अनेक लोकांची अपेक्षा आहे, असे ट्विटमध्ये वैद्य यांनी नमूद केले आहे.भारतात अनेक घडामोडी घडत आहेत. यामध्ये कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाला विरोधकांनी पाठींबा देऊन आंदोलनाचा सरकारविरोधात राजकीय हत्यार म्हणून वापर केला आहे.

    विविध राज्यात काँग्रेसचा सपाटून पराभ झाल्यावर एव्हिएमवर खापर फोडणे आणि विजयी झाल्यावर शांत राहणे, असे काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे धोरण सुरु आहे.

    विशेष म्हणजे, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार जनतेने निवडून दिले आहे. त्याद्वारे भारतात लोकशाही व्यवस्थाच मतदारांनी मजबूत करून देशातील अस्थिरता कमी केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडे भारताचे प्रश्न सोडविण्याची गांधी यांची मागणीच हास्यास्पद ठरली आहे .

    Take the initiative to solve India’s problems; Rahul Gandhi’s demand for America

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार