वृत्तसंस्था
गुवाहाटी : आसाम राज्यातील 5 मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे राज्य सरकारने मंगळवारी सांगितले. यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले उचलता येतील. मुख्यमंत्री हिमंत विश्व सरमा यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडियावर लिहिले की, जनता भवनमध्ये एका बैठकीदरम्यान मुख्यमंत्री हिमंत विश्व सरमा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आसामच्या मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या(गोरिया, मोरिया, देशी, सैयद आणि जोल्हा) सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या आढाव्यानुसार मूळ अादिवासी अल्पसंख्याकाच्या व्यापक सामाजिक-राजकीय आणि शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने पाऊल उचलण्यासाठी राज्य सरकार मार्गदर्शन करेल.Survey of Socio-Economic Status of 5 Tribal Muslims of Assam; Assam government’s decision after Bihar data
बालविवाहाविरोधी मोहिमेत 1040 अटकेत
आसाम सरकारने जवळपास 8 महिन्यांनंतर राज्यात बालविवाहाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री हिमंत बिश्व सरमा म्हणाले होते की, भाजपला बालविवाह आणि बहुविवाहसारख्या कुप्रथात अडकलेल्या मियां लोकांच्या मतांची गरज नाही. मंगळवारी त्यांनी सांगितले की, राज्यात नव्याने बालविवाहाविरुद्ध अभियान सुरू झाले आहे. आतापर्यंत 1040 लोकांना या प्रकरणात अटक केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात सुमारे 3 हजार लोकांना अटक केली होती. सहा हजारांहून जास्त लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. मात्र, सायंकाळी आसाम पोलिसांच्या सीपीआरओच्या वक्तव्यात म्हटले की, 2 आणि 3 ऑक्टोबरच्या रात्री एकूण 916 आरोपींना पकडले आहे. एकूण 706 प्रकरणे नोंदली आहेत.
11 जिल्ह्यांत 52 ते 99% मुस्लिम, अल्पसंख्याक दर्जा हिसकावण्याचा विचार
2011च्या जनगणनेनुसार, मुस्लिमांची एकूण संख्या 1.06 कोटी होती. ही एकूण लोकसंख्येच्या 34.22% होती. सध्या यात वाढ होऊन 40% पेक्षाही जास्त होण्याचा अंदाज आहे. आसामची लोकसंख्या सुमारे 3.50 कोटी आहे. यात 1.40 कोटी मुस्लिम आहेत.
जम्मू-काश्मीरनंतर आसाम एकूण लोकसंख्येत मुस्लिम हिस्सेदारीच्या हिशेबाने दुसरे मोठे राज्य आहे. आसाममध्ये इस्लाम दुसरा सर्वात मोठा धर्म आणि सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे. यात वेगाने वाढणाऱ्या खासगी मदरशांची महत्त्वाची भूमिका आहे.
राज्यातील 11 जिल्ह्यांत 52% ते 99% पर्यंत मुस्लिम लोकसंख्या आहे. 8 इतर जिल्ह्यांत मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढली आहे. राज्य सरकार हे लक्षात घेऊन या जिल्ह्यांत मुस्लिमांना अल्पसंख्याक दर्जा हिरावण्याचा विचार करत आहे.
Survey of Socio-Economic Status of 5 Tribal Muslims of Assam; Assam government’s decision after Bihar data
महत्वाच्या बातम्या
- सुपरस्टार राम चरण याच्या 41 दिवसाच्या व्रताची सांगता!
- पालकमंत्री पद मिळवून अजितदादांनी शिंदे गटावर मात केल्याची बातमी; पण दादांना राजकीय किंमत करावी लागणार चुकती!!
- आशियाई क्रीडा स्पर्धेत ७१ पदकं जिंकून भारताने स्वतःचाच विक्रम मोडत रचला इतिहास
- जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार