विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ना उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना निमंत्रण, ना घेतली महाराष्ट्राची दखल, पण तरी देखील केवळ प्रसिद्धीसाठी DMK ला पाठिंबा द्यायची सुप्रिया सुळेंची धावपळ!!, असला प्रकार समोर आला.
त्याचे झाले असे :
Fair delimitation च्या नावाखाली तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज चेन्नईमध्ये बैठक बोलावली. केंद्रातले मोदी सरकार लोकसभेची संख्यात्मक फेररचना करताना दक्षिणेतल्या सर्व राज्यांवर आणि उत्तरेतल्या काही अन्याय करेल अशी भीती पसरवून संभाव्य delimitation च्या वातावरण निर्मिती चालवली. स्टालिन यांनी आपल्या मंत्र्यांना कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, पंजाब या राज्यांमध्ये पाठवून तिथल्या मुख्यमंत्र्यांना आणि महत्त्वाच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण दिले. अन्याय करणाऱ्या डीलिमिटेशन विरोधात तामिळनाडू लढेल आणि जिंकेल, असे टी-शर्ट घालून तामिळनाडूतल्या DMK पक्षाचे खासदार संसदेत गेले. तिथे त्यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. त्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना झापले.
त्यानंतर मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी आज एक व्हिडिओ देखील जारी केला. त्यामध्ये त्यांनी डी लिमिटेशन विरोधात तामिळनाडू का लढतो आहे??, याचे सविस्तर वर्णन केले. त्यावेळी त्यांनी वर उल्लेख केलेल्या दक्षिणेतल्या, पूर्वेतल्या आणि उत्तरेतल्या विशिष्ट राज्यांची नावे त्यांनी घेतली. पण महाराष्ट्राचे नाव बिलकुल घेतले नाही. शिवाय चेन्नईतल्या बैठकीचे त्यांनी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना निमंत्रण देखील पाठवले नाही. कारण स्टालिन यांच्या मते महाराष्ट्रावर कुठला अन्यायच झालेला नाही.
एवढे असून देखील सुप्रिया सुळे यांनी न मागताच परस्पर DMK पाठिंबा द्यायची उतावळी दाखवली. त्यांनी तामिळनाडूच्या खासदारांबरोबर फोटो काढून तो आपल्या सोशल मीडियावर अकाउंट वर शेअर केला. त्या फोटो त्यांच्याबरोबर पवारांच्याच राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके देखील दिसले. सोशल मीडिया अकाउंट वर सुप्रिया सुळे यांनी We support DMK असे लिहिले. पण यातून चमकोगिरी खेरीज दुसरे काहीच समोर दिसले नाही.
Supriya sule hastily supports DMK
महत्वाच्या बातम्या