• Download App
    शरद पवारांनी भाकरी फिरवली! सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड! Supriya Sule and Praful Patel elected as working president of NCP

    शरद पवारांनी भाकरी फिरवली! सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड!

    अजित पवारांना साईड ट्रॅक? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज भाकरी फिरवली.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि  प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या  कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तर अजित पवारांचे नाव नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. Supriya Sule and Praful Patel elected as working president of NCP

    याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे  मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड आणि गोवा  या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब, महिला, युवक-युवती आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी दिली गेली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या राजकीय वयाच्या पंचविशीत प्रवेश करत असताना राजधानी नवी दिल्लीतल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्य पोस्टरवर संस्थापक खासदार शरद पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबरच संसदीय दलाच्या नेत्या म्हणून सुप्रिया सुळे यांचेच फोटो लागलेले दिसले. त्याच वेळेस स्टेजवर बाकीच्या नेत्यांबरोबरच महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते अजितदादा पवारही दिसले. पण सुप्रिया सुळे मात्र या कार्यक्रमात दिसल्या नाहीत.

    “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही साथीदारांवर नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत आहोत”, असं शरद पवारांनी भाषणात जाहीर केलं.

    गेल्याच महिन्यात शरद पवारांच्या विस्तारित आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी अचानक निवृत्ती नाट्य घडवून आणले. त्यामुळे शरद पवारांचा नेमका राजकीय वारस कोण?, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी वारस या विषयाची चर्चा थांबलेली नाही. या पार्श्वभूमीवर अजित पवार स्टेजवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या पोस्टरवर शरद पवार प्रफुल्ल पटेल यांच्या बरोबरीने फक्त सुप्रिया सुळे यांचे पोस्टर लागणे त्याला विशेष महत्त्व आहे. यातून पवारांनी राष्ट्रीय पातळीवर आपला वारस निश्चित केल्याचे मानले जात आहे.

    Supriya Sule and Praful Patel elected as working president of NCP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार