• Download App
    दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून सुप्रीम कोर्टाने पतंजलीला फटकारले; भ्रामक जाहिराती बंद करण्याचे निर्देश|Supreme Court slams Patanjali over misleading ads; Instructions to stop misleading advertisements

    दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून सुप्रीम कोर्टाने पतंजलीला फटकारले; भ्रामक जाहिराती बंद करण्याचे निर्देश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (21 नोव्हेंबर) बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला फटकारले आहे. आधुनिक औषध पद्धतींच्या विरोधात दिशाभूल करणारे दावे आणि जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल कोर्टाने फटकाले आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने याचिका दाखल केली होती.Supreme Court slams Patanjali over misleading ads; Instructions to stop misleading advertisements

    न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले- ‘पतंजली आयुर्वेदाला खोटे आणि दिशाभूल करणारे दावे असलेल्या सर्व जाहिराती त्वरित बंद कराव्या लागतील. न्यायालय अशा कोणत्याही उल्लंघनास गांभीर्याने घेईल आणि उत्पादनावरील प्रत्येक खोट्या दाव्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारू शकते.



    न्यायालयाला तोडगा काढायचाय

    यानंतर, न्यायालयाने निर्देश दिले की पतंजली आयुर्वेद भविष्यात अशी कोणतीही जाहिरात प्रकाशित करणार नाही आणि प्रेसमध्ये अशी आकस्मिक विधाने केली जाणार नाहीत याची देखील काळजी घेईल. ‘अ‍ॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद’ या वादात या मुद्द्याचे रुपांतर करू इच्छित नाही, तर भ्रामक वैद्यकीय जाहिरातींच्या समस्येवर खरा तोडगा काढू इच्छितो, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

    पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी 2024 रोजी

    खंडपीठाने भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज यांना सांगितले की, केंद्र सरकारला या समस्येचा सामना करण्यासाठी व्यवहार्य तोडगा काढावा लागेल. न्यायालयाने सरकारला सल्लामसलत करून न्यायालयात येण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.

    Supreme Court slams Patanjali over misleading ads; Instructions to stop misleading 10

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड