• Download App
    शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अभिषेक बॅनर्जींना दणका, CBI-ED तपासाला स्थगिती देण्यास नकार|Supreme Court slams Abhishek Banerjee in teacher recruitment scam, refuses to stay CBI-ED investigation

    शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अभिषेक बॅनर्जींना दणका, CBI-ED तपासाला स्थगिती देण्यास नकार

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी TMC खासदार अभिषेक बॅनर्जी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. कोर्टान या प्रकरणी ईडी व सीबीआय चौकशीला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. पण कोलकाता उच्च न्यायालयाच्या 25 लाखांचा दंड ठोठावण्याच्या निर्णयाला यावेळी स्थगिती दिली. कोलकाता उच्च न्यायालयाने 18 मे रोजी तपास यंत्रणांना बॅनर्जी यांची चौकशी करण्याची परवानगी दिली होती.Supreme Court slams Abhishek Banerjee in teacher recruitment scam, refuses to stay CBI-ED investigation

    न्यायमूर्ती जे के माहेश्वरी व पीएस नरसिम्हा यांच्या सुट्टीच्या खंडपीठाने सांगितले की, ते या प्रकरणाची सुनावणी सुट्टीनंतर करतील. त्यांनी सुनावणीसाठी 10 जुलै ही तारीख निश्चित केली आहे.



    20 मे रोजी बॅनर्जींची 9 तास सीबीआय चौकशी

    या प्रकरणाच्या तपासासंदर्भात सीबीआयने बॅनर्जी यांना 20 मे रोजी समन्स बजावले होते. त्यांची सलग 9 तास चौकशी करण्यात आली. आपल्या याचिकेत बॅनर्जींनी सुप्रीम कोर्टाला एजन्सीला आपल्याविरोधात कोणतीही कठोर पाऊले न उचलण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती.

    चौकशीनंतर बाहेर पडताना अभिषेक म्हणाले होते की, या चौकशीमुळे माझा व सीबीआयचा वेळ वाया गेला. आम्ही दिल्लीच्या साहेबांचे पाळीव कुत्रे बनणार नाही. त्यामुळेच आम्हाला टार्गेट करण्यात आले. नोटाबंदीवर अभिषेक म्हणाले की, आता मतदान बंदीची वेळ आली आहे, नोटाबंदीने काहीही होणार नाही. 2024 मध्ये ‘व्होटबंदी’ होणार… 2024 मध्ये कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होईल.

    19 मे रोजी अभिषेक यांना सीबीआयची नोटीस

    शुक्रवारी, 19 मे रोजी अभिषेक यांनी ट्विटरवर सीबीआयची एक नोटीस शेअर केली. त्यात ते म्हणाले – मला उद्या म्हणजेच 20 मे रोजी सीबीआयपुढे हजर होण्याची नोटीस मिळाली आहे. अवघ्या एक दिवस अगोदर नोटीस देऊनही मी सीबीआयच्या चौकशीला हजर राहील. तपासात पूर्ण सहकार्य करेल.

    एजन्सीकडून नोटीस मिळाल्यानंतर अभिषेक यांनी आपली जनसंपर्क मोहीम तात्पुरती थांबवली होती. त्याचदिवशी सायंकाळी मीडियाशी बोलताना ते म्हणाले होते की, सीबीआयने मला उद्या सकाळी 11 वाजता बोलावले आहे. त्यामुळे मी आज रात्रीच कोलकात्याला परत जात आहे.

    Supreme Court slams Abhishek Banerjee in teacher recruitment scam, refuses to stay CBI-ED investigation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य